Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

मोठी बातमी : दाभोलकर हत्येप्रकरणी अॅड. पुनाळेकर आणि विक्रम भावेला उचलले

Spread the love

अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्याध्यक्ष नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येप्रकरणी सीबीआयने आज मोठी कारवाई करत सनातन संस्थेची बाजू सातत्याने कोर्टात मांडणारा अॅड. संजीव पुनाळेकर आणि त्यांचा सहकारी विक्रम भावे या दोघांना मुंबईतून अटक केली. दरम्यान, पुनाळेकर व भावेला उद्या सुट्टीकालीन न्यायालयात हजर करण्यात येणार असल्याचे कळते. दाभोलकर हत्या प्रकरणातील पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न केल्याच्या आरोपाखाली पुनाळेकर आणि भावे या दोघांना अटक करण्यात आल्याची प्राथमिक माहिती हाती येत आहे. दाभोलकर हत्या प्रकरणी खटल्यात आरोपींच्यावतीने संजीव पुनाळेकर व त्यांचा सहकारी भावे हे न्यायालयात बाजू मांडत आहेत.

नरेंद्र दाभोलकर यांची २० ऑगस्ट २०१३ रोजी पुण्यात ते मॉर्निंग वॉक करत असताना जवळून गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. याप्रकरणी सीबीआयने सचिन अंदुरे आणि हिंदू जनजागृती समितीचा सदस्य वीरेंद्र तावडे या दोघांना आधीच अटक केली आहे. त्यांच्या चौकशीत जी माहिती समोर आली त्याआधारे पुनाळेकर आणि भावे या दोघांना अटक करण्यात आली आहे. नालासोपारा स्फोटकप्रकरणी अटकेत असेल्या शरद कळसकरच्या तपासातून सचिन अंदुरेचे नाव पुढे आले होते.
दरम्यान पुरोगाम्यांच्या दबावातून पुनाळेकर व भावेंना अटक करण्यात आली आहे. सरकारला खरे आरोपी सापडत नसल्याने अशा पद्धतीची कारवाई केली जात असून आम्ही पुनाळेकर यांच्या पाठिशी उभे राहू, असे सनातन संस्थेचे प्रवक्ते चेतन राजहंस यांनी स्पष्ट केले आहे.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!