Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

सत्ता स्थापनेसाठी राष्ट्रपतींचे नरेंद्र मोदी यांना निमंत्रण, ३० मे रोजी होणार शपथविधी

Spread the love

एनडीए नेतेपदी निवड झाल्यानंतर नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांची राष्ट्रपती भवनात भेट घेऊन सत्तास्थापनेचा दावा केला. त्यावर राष्ट्रपतींनी मोदींना नवं सरकार स्थापन करण्यासाठी पाचारण केलं आहे. याबाबत मोदी यांनी नंतर माध्यमांना माहिती दिली. दरम्यान, मोदी ३० मे रोजी पंतप्रधानपदाची शपथ घेणार असल्याचे वृत्त एएनआयने दिले आहे. एनडीएची बैठक संपल्यानंतर भाजप अध्यक्ष अमित शहा यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने राष्ट्रपती कोविंद यांची भेट घेतली. शिष्टमंडळात राजनाथ सिंह, सुषमा स्वराज, शिरोमणी अकाली दलाचे प्रकाशसिंग बादल, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार, नितीन गडकरी, रामविलास पासवान, के. पलानीस्वामी व एनडीएच्या अन्य नेत्यांचा समावेश होता.

एनडीएने नरेंद्र मोदी यांची नेतेपदी निवड केली असल्याचे नमूद करत एनडीएतील सर्व पक्षांच्या पाठिंब्याचं पत्र शिष्टमंडळाने राष्ट्रपतींकडे सुपूर्द केलं. त्यानंतर काही वेळातच मोदी यांनी राष्ट्रपतींची भेट घेऊन सत्तास्थापनेचा दावा केला. या भेटीनंतर माध्यमांशी बोलताना आता जराही वेळ वाया न घालवता जनतेसाठी कामाचा धडाका लावणं यालाच आमचा प्राधान्यक्रम असल्याचे मोदींनी सांगितले.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!