सुरतमधील अग्निकांडातील मृत्यूची संख्या २२ वर , मानवाधिकार आयोगाची सरकारला नोटीस

Spread the love

सुरत येथील तक्षशीला व्यापारी संकुलाला शुक्रवारी लागलेल्या भीषण आगीप्रकरणी शनिवारी कोचिंग क्लासचा मालक भार्गव बुटानी याला अटक करण्यात आली, तर हर्शुल वेकारिया आणि जिग्नेश पालिवाल हे दोन बिल्डर फरारी असल्याचे पोलिसांनी सांगितले. आगीत होरपळलेल्या दोन मुलींचा शनिवारी उपचार सुरू असताना मृत्यू झाल्याने या दुर्घटनेतील मृतांचा आकडा २२ झाला आहे. या भीषण दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेले सर्व तिसऱ्या मजल्यावरील कोचिंग क्लासचे विद्यार्थी असून ते १७-१८ वयोगटातील आहेत. त्यात १७ विद्यार्थिनी आणि चार विद्यार्थ्यांचा समावेश असल्याचे पोलिसांनी शनिवारी सांगितले. चार ते पाच वर्षांचे एक मूल देखील यात जखमी झाले असून त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. दरम्यान सुरतमधील आगीत २२ मुलांचा मृत्यू झाल्याप्रकरणी राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाने शनिवारी गुजरात सरकारच्या मुख्य सचिवांना नोटीस बजावली. याप्रकरणी इमारत मालक आणि संबंधितांवर काय कारवाई केली याचा विस्तृत अहवाल सादर करण्याचे आदेश आयोगाने सरकारला दिले आहेत.

Advertisements

आपलं सरकार