It seems you're using an unsafe, out-of-date browser. CLOSE(X)

राहुलसाठी अमेठीकरांची ” विस्मृती ” आणि जागवली “स्मृती ” , काँग्रेसच्या मतदारसंघात कमळ फुलते तेंव्हा…

Advertisements

<SCRIPT charset=”utf-8″ type=”text/javascript” src=”//ws-in.amazon-adsystem.com/widgets/q?rt=tf_cw&ServiceVersion=20070822&MarketPlace=IN&ID=V20070822%2FIN%2F19840a8-21%2F8010%2F637dff1b-7428-4e7b-82fe-5ee3099bc298&Operation=GetScriptTemplate”> </SCRIPT> <NOSCRIPT><A rel=”nofollow” HREF=”//ws-in.amazon-adsystem.com/widgets/q?rt=tf_cw&ServiceVersion=20070822&MarketPlace=IN&ID=V20070822%2FIN%2F19840a8-21%2F8010%2F637dff1b-7428-4e7b-82fe-5ee3099bc298&Operation=NoScript”>Amazon.in Widgets</A></NOSCRIPT>

Spread the love

राजकारण “बडी बुरी बला ” आहे, असेच म्हटले पाहिजे . राजकारणात पराभूत होणाऱ्या मोठ्या नेत्यांचे शल्यही मोठेच असते. मग हि कथा तर काँग्रेस नेते राहुल गांधी यांची आहे. अमेठी हा त्यांचा पारंपरिक मतदारसंघ. संजय गांधी यांच्यापासूनचा. अमेठी, रायबरेली, पिलिभीत आणि सुलतानपूर  हे गांधी घराण्याचे परंपरागत मतदारसंघ. यावेळी अमेठीला हिसकावण्यात भाजपला यश आले आहे. मागच्या वेळी आपने कवी कुमार विश्वास यांच्या माध्यमातून या मतदार संघाला जिंकण्याचा प्रयत्न केला होता पण बात बनली नाही. राहुल आणि  प्रियांका यांचे भावनिक नाते  असलेला हा मतदारसंघ. भावाला देशभर प्रचारासाठी वेळ मिळावा म्हणून प्रियंकाने या मतदारसंघात ठाण मांडले. पण उपयोग झाला नाही. यावेळी स्मृती इराणी यांची जादू भारी पडली आणि तब्बल ५५ हजार १२० मतांनी राहुल गांधी यांचा स्मृती इराणी यांनी पराभव केला त्यामुळे देशभर  अमेठीच्या भरोशावर बिनधास्त फिरणारे राहुल गांधी अमेठीकरांच्या विस्मृ आणि स्मृतीच्या प्रेमात पाडावेत  मग राहुल यांच्या डोळ्यात अश्रू आले नसते तरच नवल!!

अमेठी हा लोकसभा निवडणूक २०१९मध्ये सर्वाधिक चर्चेत राहिलेला मतदारसंघ. इथे काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी आणि भाजप नेत्या, केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांच्यात टक्कर होती. राहुल यांचा अमेठीत पराभव झाल्यानंतर अमेठीतील राजकीय चित्र पालटले आहे. अशा प्रकारे संजय गांधी यांच्यानंतर राहुल असे ‘गांधी’  आहेत, ज्यांना अमेठीच्या जनतेने नाकारले आहे. या विजयाने सद्गदीत झालेल्या स्मृती इराणी यांनी अमेठीतील जनतेसाठी नवी पहाट उगवली आहे, अशी प्रतिक्रिया देत आनंद व्यक्त केला. अमेठीतील विजयानंतर स्मृती इराणी यांनी ट्विट करत आपल्या भावना व्यक्त केल्या. आपला विजय म्हणजे अमेठीवासीयांसाठी एक नवी पहाट नवा संकल्प घेऊन उगवल्याचे स्मृती यांनी म्हटले आहे. ट्विटमध्ये त्यांनी अमेठीकरांना धन्यवाद दिले आहेत. अमेठीतील जनतेने विकासावर विश्वास दाखवत कमळाचे फूल फुलवल्याचेही त्यांनी नमूद केले आहे.

Advertisements


Advertisements

स्मृती इराणी यांनी आपल्या विजयाचे श्रेय भाजपच्या कार्यकर्त्यांना दिले आहेत. राहुल यांच्यावर टीका करताना त्या म्हणाल्या की, एका बाजूला एक कुटुंब होते, तर दुसऱ्या बाजूला होती एक संघटना. ही संघटना अमेठीतील लोकांसाठी एखाद्या कुटुंबासारखेच काम करत होती. या वेळी केरळ आणि बंगालमध्ये आपले प्राण गमावलेल्या कार्यकर्त्यांनाही त्यांनी आपल्या विजयाचे श्रेय दिले. इराणी यांनी राहुल यांचा ५५, १२० मतांनी पराभव केला. स्मृती इराणींना अमेठीत ४,६७,५९८ तर राहुल यांना ४, १३, ३९४ इतकी मते मिळाली. अमेठी हा काँग्रेसचा गड मानला जातो. सन २००४ पासून राहुल येथून विजयी होत आले आहेत. २०१४ च्या निवडणुकीत राहुल यांनी स्मृती इराणींचा १,०७,९०३ मताधिक्याने पराभव केला होता.