Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

सोळावी लोकसभा बरखास्त करण्याची शिफारस आणि वेगवान घडामोडी …

Spread the love

सोळावी लोकसभा बरखास्त करण्याची शिफारस केंद्रीय मंत्रिमंडळाने राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्याकडे केली आहे. आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत याबाबतच्या प्रस्तावाला मंजुरी देण्यात आली.  केद्रीय मंत्रिमंडळाने शिफारस केल्याने आता राष्ट्रपती कोणत्याही क्षणी लोकसभा बरखास्त करू शकतात. सोळाव्या लोकसभेचा कार्यकाळ ३ जून रोजी समाप्त होत आहे. त्यामुळे ३ जूनच्या आधी सतरावी लोकसभा अस्तित्वात येणे अपेक्षित असून त्या प्रक्रियेलाही आता वेग येणार आहे.
तिन्ही निवडणूक आयुक्त राष्ट्रपतींना भेटून लोकसभेच्या नवनिर्वाचित सदस्यांची यादी त्यांच्याकडे सोपवणार आहेत. त्यानंतरच नव्या लोकसभेच्या स्थापनेची प्रक्रिया सुरू होणार आहे.

वेगवान घडामोडी….

केंद्रीय मंत्रिमंडळाने १६वी लोकसभा बरखास्त करण्याचा प्रस्ताव केला मंजूर

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याशी भाजपचे अध्यक्ष अमित शहा यांनी फोनवरून केली चर्चा, दिल्लीत उद्या होणाऱ्या एनडीएच्या बैठकीसाठी दिलं निमंत्रण

उद्या एनडीएच्या बैठकीसाठी  दिल्ली दौऱ्यावर जाण्याचे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे नियोजन

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचाही उद्या  सर्व नवनिर्वाचित खासदारांसह दिल्लीला जाण्याचे नियोजन.

अमेठीत काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्या पराभवाची जबाबदारी स्वीकारत अमेठी जिल्हा काँग्रेस अध्यक्ष योगेंद्र मिश्रा यांनी दिला पदाचा राजीनामा

भाजपची हिंदुत्व कार्डाची खेळी यशस्वी ठरली, गोडसेला देशभक्त बोलणारी जिंकली; असदुद्दीन ओवेसी यांची प्रज्ञासिंह ठाकूर यांच्यावर टीका

पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शहा यांनी ज्येष्ठ नेते मुरली मनोहर जोशी यांची भेट घेतली , ज्येष्ठ नेते लालकृष्ण आडवाणी यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांचेही आशीर्वाद घेतले.

यापुढे बदलाचे, द्वेषाचे राजकारण करणार नाहीः पंतप्रधान मोदी

काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्या अभिनंदनाच्या ट्विटला पंतप्रधान मोदी यांचे धन्यवादाने प्रत्युत्तर

गुलबर्गमधून मल्लिकार्जुन खर्गे यांचा पराभव; भाजपचे उमेश जाधव विजयी

पूर्व दिल्ली मतदारसंघातून भाजपच्या गौतम गंभीरचा विजय

लोकसभा निवडणुकीतील निकालांनंतर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पंतप्रधान मोदींचे केले अभिनंदन

गुरुदासपूर मतदारसंघातून अभिनेता सनी देओल ८२,४५९ मतांनी विजयी; काँग्रेसच्या सुनील जखर पराभूत

उपराष्ट्रपती वैंकय्या नायडू यांच्याकडून लोकसभा निवडणुकीत उत्स्फूर्तपणे सहभागी झाल्यापासून देशवासीयांचे अभिनंदन

आपलं सरकार

Click to listen highlighted text!