Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

Maharashtra : लोकसभा निवडणूक संपताच पोलीस अधिकाऱयांच्या बदल्या , कोण ? कुठे गेले ते पहा …

Spread the love

लोकसभा निवडणूक संपताच राज्यातील वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या. यामध्ये आयपीएस अधिकारी मधुकर पांडे यांची मुंबईच्यापोलीस सहआयुक्तपदी म्हणून वाहतूक शाखेत  बदली करण्यात आली. तर रविंद्र शिसवे यांची पदोन्नती करत पुण्याच्या पोलीस सहआयुक्तपदी बदली झाली आहे. पांडे, शिसवे यांच्यासह नवल बजाज यांची मुंबईत सहपोलीस आयुक्तपदी प्रशासन विभागात बदली झाली. सुरेश मेकला यांची ठाणे शहराच्या पोलीस सहआयुक्तपदी तर निकेत कौशिक यांच्याकडे कोकण विभागाचे पोलीस महानिरीक्षकपदाचा कार्यभार सोपविण्यात आला आहे.

आयपीएस अधिकारी ए. डी. कुंभारे यांची पदोन्नती करत मुंबई परिमंडळ ८ चे पोलीस उपायुक्त ते ठाणे येथे प्रशासन विभागात अपर पोलीस आयुक्त बदली करण्यात आली. ज्ञानेश्वर चव्हाण यांची मुंबईच्या परिमंडळ २ चे पोलीस उपायुक्त ते मुंबईच्या सरंक्षण आणि सुरक्षा विभागाचे अपर पोलीस आयुक्त अशी पदोन्नती करण्यात आली आहे. दिलीप सावंत यांची मुंबईच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेचे पोलीस उपायुक्त ते मुंबईच्या उत्तर विभागाचे अपर पोलीस आयुक्त, एस. एच. महावरकर यांची सोलापूर शहराचे पोलीस उपायुक्त ते नागपूर शहराच्या उत्तर विभागाचे अपर पोलीस आयुक्त, एस. डी. येनपुरे यांची मुंबई मरोळ येथील एलए विभागाचे पोलीस उपायुक्त ते ठाणे शहर पश्चिम विभागाचे अपर पोलीस आयुक्त, नवीनचंद्र रेड्डी यांची मुंबईच्या परिमंडळ – १० चे पोलीस उपायुक्त ते पुण्याच्या राज्य राखीव बलाचे पोलीस उपमहानिरीक्षक (सध्याचे पोलीस अधीक्षक, राज्य राखीव पोलीस बल) आणि रामनाथ पोकळे यांची राज्य गुप्तवार्ता विभागाचे उपायुक्त ते पिंपरी – चिंचवडच्या अपर पोलीस आयुक्त पदी पदोन्नती करण्यात आली आहे. तसेच एम. बी. तांबडे यांची सोलापूर शहराचे पोलीस आयुक्त ते गडचिरोलीचे (नागपूर कॅम्प) पोलीस उपमहानिरीक्षक, सत्यनारायण यांची ठाणे शहराच्या पश्चिम विभागाचे अपर पोलीस आयुक्त ते मुंबई व्ही. आय. पी. सुरक्षा विभागाचे पोलीस उपमहानिरीक्षक, अंकुश शिंदे यांची गडचिरोली (नागपूर कॅम्प) पोलीस उपमहानिरीक्षक ते सोलापूर शहराचे पोलीस आयुक्त आणि श्रीकांत तरवडे यांची अमरावतीच्या अमरावती परिक्षेत्राच्या पोलीस उपमहानिरीक्षक ते पुणे शहराच्या दक्षिण विभागाचे अपर पोलीस आयुक्त अशा प्रकारे या आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!