Loksabha 2019 : कोण काय म्हणाले ? जेत्यांच्या आणि पराभूतांच्या प्रतिक्रिया ….

Spread the love

मोदींसमोर कुणाचाच टिकाव लागणार नाही; युतीवर शिक्कामोर्तब झाल्यानंतर विजय निश्चित झाला होता: शिवसेना नेते संजय राऊत यांनी प्रतिक्रिया

Advertisements

मोदींच्या नेतृत्वावर जनतेचा विश्वास, ही लाट नव्हे तर त्सुनामी आहे: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस , दुष्काळातही महाराष्ट्रातील जनतेनं भरभरून प्रेम दिलं.

मी मुख्यमंत्र्यांशी पैज लावलीय: सुजय विखे

हा भारताचा विजय: नितीन गडकरी

पुण्यातील विजयाचे श्रेय पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याबरोबरच शहारातील सर्व खासदार-आमदार, पदाधिकारी आणि विविध क्षेत्रांत काम करणारे कार्यकर्त्यांचे आहे: गिरीश बापट

 पुणे: लोकांचा निर्णय आम्हाला मान्य, मात्र लोकांना ईव्हीएमबाबत शंका होत्या हेही सत्य आहे; शरद पवार यांचे सूचक उद्गार

भाजपचा विजय अनपेक्षित; ईव्हीएमवर संशय: शरद पवार

नागपूर: नाना पटोलेंनी राजकीय संन्यास घेऊ नये. जनतेचा कौल स्वीकारायला हवा. लोकशाहीमध्ये कुणाला तरी बहुमत मिळते, कुणी तरी हरत असतं. याचा अर्थ राजकीय संन्यास घ्यावा असे होत नाही- नितीन गडकरी

मी गोपाळ शेट्टी यांचे अभिनंदन करते. ईव्हीएममधील उणिवांबाबत माहिती मिळाली आहे. त्याचा अहवाल तयार केला आहे. तो संध्याकाळपर्यंत निवडणूक आयोगाकडे सोपवण्यात येईल: उर्मिला मातोंडकर, काँग्रेस उमेदवार, उत्तर मुंबई

पराभव स्वीकारला. कार्यकर्त्यांनी खचून जाऊ नये. विधानसभेच्या तयारीला लागा; काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांची प्रतिक्रिया

आपलं सरकार