Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

Gujrat : सुरतमधील इमारतीला लागलेल्या आगीत १९ जणांचा मृत्यू

Spread the love

सुरत येथील सरथाना भागातील तक्षशीला कॉम्पलेक्स इमारतीला लागलेल्या भीषण आगीत १९ जणांचा मृत्यू झाल्याचे प्राथमिक वृत्त आहे. यातील बहुतांश विद्यार्थी आहेत. मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे. अग्निशमन दलाच्या १९ गाड्या घटनास्थळी पोहोचल्या असून आग विझवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. तक्षशीला ही कमर्शियल इमारत आहे, इथे चालू असलेल्या कोचिंग क्लासमध्ये ही आग लागली. आग इतकी भयानक होती की, काही विद्यार्थ्यांनी घाबरुन इमारतीच्या मजल्यावरुन उड्या मारल्या. ताज्या माहितीनुसार आतापर्यंत या दुर्घटनेत १९ जणांचा मृत्यू झाला आहे, तर १५ लोकांना जवळच्या रुग्णालयात भरती करण्यात आले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या अपघातानंतर ट्विट करून दुःख व्यक्त केले आहे. पंतप्रधानांनी गुजरात सरकार आणि स्थानिक अधिकाऱ्यांना यातील पीडितांना सर्वोतोपरी मदत करण्याचे आदेश दिले आहेत.

या इमारतीत एक डान्स क्लास आणि फॅशन इन्स्टिट्यूट आहे. इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावर आग लागली. ३५ जण अडकल्याची माहिती आहे. अनेकांनी जीव वाचवण्यासाठी इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावरून उड्या मारल्या. तक्षशीला कॉम्पलेक्स हे एक कमर्शिअल कॉम्प्लेक्स आहे. यात अनेक दुकानं आणि कोचिंग सेंटर आहेत. आगीचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही, मात्र एसी डक्ट्स आणि कॉम्प्रेसर्समुळे आग लागल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. दरम्यान, गुजरातचे मुख्यमंत्री विजय रुपाणी यांनी आगीच्या घटनेच्या चौकशीचे आदेश दिले आहेत. तसेच मृतांच्या नातेवाईकांना ४ लाख रुपयांची आर्थिक मदत जाहीर केली आहे.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!