भारताची धावपटू द्युती चंदचे प्रकरण नेमके आहे तरी काय ?

Spread the love

भारताची धावपटू द्युती चंद सध्या वेगळ्याच कारणावरून चर्चेत आहे . काय आहे हे प्रकरण या विषयी जाणून घेऊयात . द्युती ने रविवारी आपण समलिंगी जोडीदारासोबत रिलेशनशीपमध्ये असल्याचे स्पष्ट केले. काही वर्षांपासून ओळख असलेल्या तिच्याच शहरातील एका मुलीसोबत ती रिलेशनशीपमध्ये असल्याचे तिने जाहीरपणे सांगितले. १०० मीटर शर्यतीत विक्रम नोंदवणारी व २०१८ मधील आशियाई स्पर्धेत दोन रौप्य पदक मिळवणारी द्युती आपले समलैगिंक संबंध असल्याचे सांगणारी पहिली भारतीय क्रीडापटू ठरली. मात्र, द्युतीने काही कारणांसाठी आपल्या जोडीदाराची ओळख लपवली.

Advertisements

द्युतीने आपले समलिंगी संबंध असल्याचे जाहीर केल्यानंतर तिच्या कुटुंबीयांना ही बाब रुचली नाही. द्युतीच्या कुटुंबीयांनी तिला या गोष्टीमुळे धमकीही दिल्याचे सूत्रांकडून सांगण्यात येत होते. याबाबत द्युतीने स्वतः मौन सोडले आहे. “मी समलिंगी संबंधांबद्दल जाहीरपणे बोलल्यानंतर माझ्या बहिणीने मला घराबाहेर काढण्याची धमकी दिली. माझ्या भावाबरोबरही तिने असेच केले आहे, कारण माझ्या भावाच्या पत्नीशी तिचे पटत नाही. पण मी माघार घेणार नाही. मी सज्ञान आहे’, असे तिने स्पष्टपणे सांगितले.

पण द्युतीची मोठी बहीण सरस्वती चंद यांनी मात्र याबाबत वेगळी माहिती दिली. “द्युतीची समलिंगी जोडीदार हिने द्युतीला ब्लॅकमेल केले असून मालमत्ता आणि पैशासाठी तिने द्युतीवर दबाव टाकला,” असा आरोप सरस्वती चंद यांनी केला आहे. पण हे आरोप द्युतीने फेटाळून लावले आहेत. तर “माझ्या मोठ्या बहिणीनेच  मला ब्लॅकमेल केले असून तिने माझ्याकडून २५ लाख रुपयांची मागणी केली.  मला तिने एकदा मारहाणही केली. याबाबत मी पोलिसांकडे तक्रारही केली होती. तिने मला माझ्या समलिंगी रिलेशनशीपबद्दल ब्लॅकमेल केले, त्यामुळे मला याबाबत जाहीरपणे बोलावे लागले, असे द्युतीने स्पष्ट केले.

आपलं सरकार