Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

Loksabha 2019 : मतमोजणीचे लाईव्ह कव्हरेज …लोकसभा निवडणुकीचा आज निकाल; संपूर्ण देशाचे लक्ष

Spread the love

काँग्रेसचे शशी थरूर पिछाडीवर

देशभरातील १०० हून अधिक जागांचे निवडणूक निकालांचे सुरुवातीचे कल हाती, भाजपप्रणित एनडीए आघाडीवर

भोपाळ : प्रारंभ  भोपाळलोकसभा मतदारसंघामध्ये प्रज्ञा सिंह आघाडीवर, दिग्विजय सिंह पिछाडीवर

गांधीनगर : भाजपाध्यक्ष अमित शहा 25 हजार मतांनी आघाडीवर

#Mahanayak_Live….#Loksabha_2019

#Maharashtra :00 /48

#NDA :02

#UPA : 01

#Other : 00

 #India 00/543

 #NDA :24 /543

#UPA : 14/543

#Other : 05/543

 

सकाळी आठ वाजल्यापासून मतमोजणी

अवघ्या जगाचे लक्ष लागलेल्या भारतातील लोकशाहीचा सर्वात मोठा उत्सव आज, गुरुवारी सर्वोच्च शिखर गाठणार आहे. सतराव्या लोकसभेच्या ५४३ पैकी ५४२ जागांचे निकाल जाहीर होणार असून, सकाळी आठ वाजल्यापासून मतमोजणी सुरू होणार आहे. अंतिम निकाल गुरुवारी मध्यरात्री ते शुक्रवार सकाळपर्यंतच हाती येण्याची शक्यता असली तरी निकालाचा कल स्पष्ट होताच ‘विजेता कोण?’ हे कळून चुकेल. पैशाचा अमाप वापर झाल्याचे सिद्ध झाल्याने तमिळनाडूतील वेल्लूर लोकसभा मतदारसंघातील निवडणूक आयोगाने रद्द केली आहे.

मतमोजणी केंद्र परिसरात कलम 144 लागू

जिल्हाधिकारी, तथा जिल्हा निवडणुक निर्णय अधिकारी औरंगाबाद यांचे मार्फत पोलीस आयुक्तालय, औरंगाबाद शहर हद्दीतील सार्वत्रिक लोकसभा निवडणुक -2019 चे मतमोजणीचे ठिकाणी सेंन्ट्रल ईन्स्टीट्युट ऑफ प्लास्टीक इंजिनिअरींग ॲन्ड टेक्नॉलॉजी (सिपेट), प्लॉट नं. 1, बी/1, (मेल्ट्रॉन बिल्डींग) एमआयडीसी इंडस्ट्रीयल एरीया, चिकलठाणा, विमानतळ समोर, जालना रोड औरंगाबाद व परिसरात दि. 23 मे 2019 चे सकाळी 6.00 वाजे पासून ते मतमोजणी प्रक्रिया पुर्ण होई पर्यंत फौजदारी प्रक्रिया संहिता सन 1973 क्रमांक 2/1974 चे कलम 144 (3) अन्वये मनाई आदेश अंमलात राहील.

या ठिकाणी व 200 मीटरच्या परिसरात मतमोजणी प्रक्रिया शांततेत पार पडावी म्हणुन मतमोजणी प्रक्रियेत नेमलेल्या, निवडणुक आयोगाने ठरवुन दिलेले इसम व उमेदवार यांचे व्यतिरीक्त इतर कोणत्याही व्यक्तीस प्रवेश करण्यास मनाई करण्यात येत आहे,  असे पोलीस उप आयुक्त (मु.) औरंगाबाद शहर यांनी कळविले आहे.

कुठे पाहता येईलनिकाल ?

निवडणूक आयोगाने ‘वोटर हेल्पलाइन अ‍ॅप’ आणि आयोगाच्या https://results.eci.gov.in या वेबपोर्टलवर मतमोजणीची माहिती घेण्याची सुविधा दिली आहे. मोबाइल आणि इंटरनेटच्या साह्याने डेस्कटॉपवर दरअर्ध्या तासाला निकालाचे अपडेट्स पाहता येणार आहेत. एका फेरीसाठी ३० मिनिटांचा कालावधी लागणार असून फेरी पूर्ण झाल्यानंतर मतदान केंद्र आणि विधानसभानिहाय अहवालावर आयोगाकडून नियुक्‍त निवडणूक निरीक्षकांची स्वाक्षरी होईल. त्यानंतर हे निकाल आयोगाचे संकेतस्थळ आणि वोटर हेल्पलाइन अ‍ॅपवर अपलोड केले जाणार आहेत. हे अॅप डाउनलोड करून कोणत्याही मतदार संघातील मतमोजणीचे अपडेट्स मिळवता येतील.

औरंगाबाद लोकसभा

औरंगाबाद लोकसभा मतदारसंघात ६ लाख ५८ हजार १५७ पुरुष, तर ५ लाख ३७ हजार महिला अशा एकूण ११ लाख ९५ हजार २४२ मतदारांनी (६३.४१ टक्के) मतदानाचा हक्क बजावला आहे. चिकलठाणा एमआयडीसीमधील मेल्ट्रॉन कंपनीतील मतमोजणी केंद्रावर गुरुवारी सकाळी ८ वाजेपासून मतमोजणीला प्रारंभ होईल. सर्वप्रथम टपाली मतदान व ईटीपीबीएस मतमोजणी झाल्यानंतरच ईव्हीएमची मतमोजणी सुरू करण्यात येणार आहे. मतमोजणी प्रक्रिया ८४ टेबलवर २६ फेऱ्यांमध्ये राबविण्यात येणार असून प्रत्येक फेरी अंदाजे ३० ते ४५ मिनिटांची राहील.

मराठवाड्यातील मतदान

मतदारसंघ/ एकूण मतदान/झालेले मतदान/टक्के

औरंगाबाद/१८८४८६६./११९६११२./६३.४६

जालना/ १८६५०४६/ १२०३८२२./ ६४.५५

परभणी/ १९८४१३०/ १२५१८२५/ ६३.०९

हिंगोली/ १७३२५४०./ ११५२२१४/ ६६.५

नांदेड/ १७१७८३०/ १११९२१०/ ६५.१५

बीड/ २०४११९०/ १३४८३९९/ ६६.०६

लातूर/ १८८३५३५./ ११७०३९८/ ६२.१४

उस्मानाबाद/ १८८६२३८/ ११९४७२६./ ६३.३४

आपलं सरकार

Click to listen highlighted text!