Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

Fake News : लोकसभा निकाल: बीबीसीच्या नावाने पसरवला जात असलेला ‘तो’ सर्व्हेचा मॅसेज फेक

Spread the love

बीबीसीच्या नावाने एक सर्व्हे सध्या व्हॉट्सअॅपवर सर्वत्र फॉरवर्ड केला जात आहे. एका स्थानिक वृत्तपत्रानेही बीबीसीच्या नावाने एक सर्व्हे प्रसिद्ध केला आहे. हा सर्व्हे खोटा असून आम्ही भारतात निवडणुकीआधी कोणतेही सर्व्हे करत नाही, असं बीबीसी न्यूजने प्रसिद्धिपत्रात म्हटलं आहे.

या प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे कि , लोकसभा निवडणुकांविषयीचा एक खोटा सर्व्हे व्हॉट्सअॅप आणि फेसबुकवर पसरताना दिसत आहे आणि हा सर्व्हे बीबीसी न्यूजने केल्याचा दावा करण्यात आला आहे. आम्ही स्पष्टपणे सांगू इच्छितो की हा सर्व्हे खोटा आहे आणि बीबीसीने केलेला नाही. बीबीसी भारतात निवडणूकपूर्व सर्व्हे करत नाही.

“बीबीसी लंडनचं विश्लेषण” अशा मथळ्याने पसरवल्या जात असलेल्या या मेसेजमध्ये प्रत्येक राज्यात कोणकोणत्या पक्षाला किती जागा मिळतील, याची सविस्तर आकडेवारी देण्यात आली आहे. याबाबत बीबीसी मराठीने दिलेल्या वृत्तात म्हटले आहे कि, काही महिन्यांपूर्वी मतदानाच्या पूर्वीच्या काळात आलेल्या दुसऱ्या एका मेसेजमध्ये दावा करण्यात आला होता की लोकसभा निवडणुकीत भाजपचा बहुमताने विजय होईल. नरेंद्र मोदी पंतप्रधानपदासाठी सर्वांत जास्त लोकप्रिय आहेत, असा दावाही बीबीसीच्या नावाने करण्यात आला आहे.

विशेष म्हणजे सध्या व्हायरल केल्या जाणाऱ्या मॅसेजमध्ये हा सर्व्हे खरा वाटावा म्हणून खाली बीबीसीच्या इंग्रजी वेबसाईटची लिंकही दिली आहे. लिंक दिल्यामुळे बीबीसीचा लोगो दिसतो आणि हा मेसेज खरा असल्याचा भास निर्माण होतो.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!