Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

व्हीव्हीपॅट मोजणीत कोणताही बदल नाही , निवडणूक अयोग्य आपल्या निर्णयावर ठाम , विरोधकांची मागणी वाऱ्यावर

Spread the love

देशभर ईव्हीएम च्या संशयावरून वादविवाद चालू आहे . ईव्हीएम मशीनमध्ये कोणतीही गडबड झाली नसल्याची खात्री व्हावी म्हणून व्हीव्हीपॅटमधील ५० टक्के चिठ्ठ्यांची ईव्हीएमसोबतच मोजणी करण्याची विरोधकांची मागणी निवडणूक आयोगाने फेटाळून लावली आहे. त्यामुळे व्हीव्हीपॅट चिठ्ठ्यांच्या मोजणीत कोणताही फेरबदल होणार नसल्याचं आयोगानं स्पष्ट केलं  आहे. एका मॅरेथॉन बैठकीत आयोगाने विरोधकांची ही मागणी फेटाळून लावल्याचं सूत्रांनी सांगितलं. लोकसभा निवडणुकीच्या निकालाला अवघे काही तास बाकी असतानाच निवडणूक आयोगाने हा निर्णय घेतल्याने विरोधाकांना मोठा झटका बसला आहे.

निर्विवाद  निकालासाठी व्हीव्हीपॅट मशीनमधील चिठ्ठी आणि ईव्हीएममधील मतं जुळतात की नाही हे पाहण्यात यावीत, त्यासाठी व्हीव्हीपॅटमधील किमान ५० टक्के चिठ्ठ्यांची ईव्हीएमसोबत मोजणी करण्यात यावी, अशी मागणी विरोधकांनी निवडणूक आयोगाकडे केली होती. त्यावर आयोगाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची आज मॅरेथॉन बैठक पार परडली. त्याला निवडणूक आयुक्त अशोक लवासाही उपस्थित होते. विरोधकांची मागणी मान्य केली तर मतमोजणीला २ ते ३ दिवस लागतील, असं आयोगाच्या अधिकाऱ्यांचं मत बनल्यानेच त्यांनी विरोधकांची ही मागणी फेटाळून लावल्याचं सूत्रांनी सांगितलं.
दरम्यान व्हीव्हीपॅटमधील चिठ्ठ्यांच्या मोजणीत कोणताही बदल न करण्याचा आणि आजपर्यंत व्हीव्हीपॅट चिठ्ठ्यांची मोजणी जशी होत होती, तशीच मोजणी करण्याचा निर्णयही आयोगानं घेतला आहे. निकालाच्या दोन दिवस आधी काँग्रेस, समाजवादी पार्टी, बसपा, टीएमसीसहीत २२ पक्षांच्या नेत्यांनी निवडणूक आयोगाकडे जाऊन ही मागणी केली होती.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!