News Updates : गल्ली ते दिल्ली , एक नजर , महत्वाच्या बातम्या

Spread the love

१. माजी पंतप्रधान राजीव गांधी यांची आज पुण्यतिथी, दिल्लीत काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी आणि काँग्रेस सरचिटणीस प्रियांका गांधींनी केलं राजघाटजवळ राजीव गांधींच्या समाधीस्थळाला अभिवादन

Advertisements

२. बेंगळुरूः आंध्रचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनी धर्मनिरपेक्ष जनता दलाचे नेते एच.डी. देवेगौडा यांची भेट घेतली

३. मुंबईः परदेशी महिलेने पोलिसात दाखल केली बलात्काराची तक्रार, आरोपीला अटक

४. दिल्लीः एनडीएतील ३६ घटक पक्षांचे नेते डिनरला उपस्थित, तीन पक्षांनी पत्र लिहून पाठिंबा दर्शवलाय, भाजपचे ज्येष्ठ नेते राजनाथ सिंह यांची माहिती,
NDAची जंगी ‘डीनर पार्टी’; मित्रपक्षांकडून मोदींचा सन्मान

५. बीड : अज्ञात वाहनाच्या धडकेत दुचाकीवरील पती-पत्नी व मुलगी जागीच ठार; वडवणी तालुक्यातील ब्रह्मनाथ तांडा येथील घटना

६. आक्षेपार्ह ट्वीट प्रकरणी अभिनेता विवेक ओबेरॉयविरोधात एफआयआर दाखल करण्याची मुंबई महिला काँग्रेसची मागणी, पोलिसांना पत्र

७. एनपीपी नेते तिरोंग अबोह यांच्या ताफ्यावर अतिरेक्यांचा हल्ला, अबोह यांच्यासह त्यांचा मुलगा आणि इतर असे एकूण ११ जणांची हत्या, घटनेनंतर सीआरपीएफचे जवान रवाना

८. नागपूरः मराठा आरक्षणामुळे खुल्या वर्गातील गुणवत्ताधारक विद्यार्थ्यांवर अन्याय, भावी डाॅक्टरांकडून संविधान चौकात निषेध

९. औरंगाबादः लोकसभा निवडणुकीतील विजयी उमेदवाराने विजयी मिरवणूक काढू नये. शहर व जिल्ह्यातील शांतता व सुव्यवस्था टिकून राहण्यासाठी सहकार्य करावे; जिल्हा व्यापारी महासंघाची मागणी

१०. डोंबिवली: खर्चाला पैसे न देणाऱ्या बापाची मुलाकडून हत्या; डोंबिवली सिद्धार्थ नगरमधील घटना

११. मध्य प्रदेशः काँग्रेस आमदारांवर माझा पूर्ण विश्वास आहे. दहा आमदारांना पद आणि पैशाच्या ऑफरचे फोन; मुख्यमंत्री कमलनाथ यांचा दावा

आपलं सरकार