Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

बुलढाण्यात टँकर आणि व्हॅन भीषण अपघातात दोन चिमूल्यांसह १३ जणांचा मृत्यू, दोन जण जखमी

Spread the love

राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६ वर मलकापूर येथे सोमवारी भीषण अपघात घडला आहे. येथे एका भरधाव टँकरने प्रवाशांनी भरलेल्या एका व्हॅनला जोरदार धडक दिली. व्हॅनमध्ये एकूण क्षमतेपेक्षा अधिक जण प्रवास करत होते. अपघात इतका भयंकर होता, की यातील ४ महिला, २ चिमुकल्यांसह १३ जणांचा मृत्यू झाला. यातील गंभीर जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. या अपघातात व्हॅनचा पूर्णतः चेंदामेंदा झाला असून  तर टँकर उलटल्याचे दिसून आले आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, टाटा मॅजिक या खासगी वाहनात क्षमतेपेक्षा अधिक १६ जण बसलेले  होते. ते मलकापूरच्या दिशेने निघाले होते. याच दरम्यान, विरुद्ध दिशेने येणाऱ्या एका भरधाव टँकरने व्हॅनला धडक दिली. या कंटेनरमध्ये केमिकल भरलेले होते. त्यामुळे, बचावकार्यात विलंब झाला. सुरुवातीला या अपघातात ८ जणांच्या मृत्यूची माहिती समोर आली होती. परंतु, बचावकार्यात एकूणच १३ मृतदेह सापडले आहेत. या अपघातातील २ जखमींना जवळच्या सरकारी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. जखमींची प्रकृती देखील चिंताजनक असल्याने मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

मृतांची नावे…

1. विरेन (६)
2. सतिश शिवरकर (८)
3. सोमीबाई शिवरकर (२५)
4. अशोक फिरके (४०)
5. नथ्थू चौधरी (४५)
6. किसन बोराडे (३०)
7. अनिल ढगे (३५)
8. छाया खडसे (३०)
9. रेखा (१७)
10. आरती (१८)
11. मिनाबाई (३०)
12. प्रकाश भारंबे

1 thought on “बुलढाण्यात टँकर आणि व्हॅन भीषण अपघातात दोन चिमूल्यांसह १३ जणांचा मृत्यू, दोन जण जखमी

Comments are closed.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!