Exit Poll : भाजपच्या गोटात आनंदी आनंद , उद्या एनडीएची प्रीतिभोजसह बैठक

Advertisements
Advertisements
Spread the love

लोकसभेचे निकाल येण्या आधीच एक्झिट पोलमधून केंद्रात पुन्हा एकदा मोदी सरकार सत्तेत येणार, असा अंदाज वर्तवण्यात आल्याने भाजपच्या गोटात आनंदी आनंद असून इस खुशीमे भाजपाध्यक्ष अमित शहा यांनी पुढील रणनिती ठरवण्यासाठी निकालाआधी उद्या (२१ मे) राष्ट्रीय लोकशाही आघाडीतील (एनडीए) घटकपक्षांची प्रीतिभोजसह बैठक बोलावली आहे.

Advertisements

या  बैठकीत लोकसभा निवडणुकीचे निकाल आणि त्यानंतर उद्भवणाऱ्या संभाव्य स्थितीवर चर्चा होणार असल्याचे सांगण्यात येत आहे . दरम्यान, १४ पैकी १२ एक्झिट पोलमध्ये एनडीएला २८२ ते ३६५ जागा मिळतील असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. त्यामुळे बहुमतासाठी आवश्यक २७२ हा जादुई आकडा एनडीए सहज पार करेल, असे भाजपला वाटत आहे. त्यामुळेच खासकरून भाजपच्या गोटात आनंदाचं वातावरण असून निकालाआधीच एनडीएचं एकीचं बळ दाखवून विरोधकांवर कडी करण्यासाठी शहा यांनी या बैठकीचं आयोजन केल्याचं सांगण्यात येत आहे. २३ मे रोजी लोकसभा निवडणुकीचे निकाल हाती येणार आहेत.

Advertisements
Advertisements

नितीन गडकरी यांच्या मते…

दरम्यान एक्झिट पोलचा अंदाज म्हणजे अंतिम निकाल नाही, असे मत केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त करून  देशात पुन्हा एकदा भाजपला स्पष्ट बहुमत मिळणार असून नरेंद्र मोदीच पुन्हा पंतप्रधान होतील, असा दावा  केला. प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना गडकरी यांनी हा दावा केला. अभिनेता विवेक ओबेरॉयची प्रमुख भूमिका असलेल्या ‘पीएम मोदी’ या सिनेमाच्या पोस्टरचं नितीन गडकरी यांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आलं. यावेळी प्रसारमाध्यमांनी विचारलेल्या प्रश्नांना उत्तर देताना गडकरी माध्यमांशी बोलत होते.

भाजपला स्पष्ट बहुमत मिळेल आणि केंद्रात एनडीएचं सरकार येईल. महाराष्ट्रातही २०१४ सारखेच निकाल लागतील, असंही त्यांनी सांगितलं. तुम्ही पंतप्रधान पदाच्या स्पर्धेत आहात का? असा सवाल केला असता या बाबत मी २० ते २५ वेळा स्पष्ट केलं आहे. आम्ही मोदींच्या नेतृत्वाखाली निवडणूक लढलो. त्यामुळे स्वाभाविकपणे तेच पंतप्रधान होतील, असं ते म्हणाले. देशातील नागरिकांनी पुन्हा एकदा भाजपवर विश्वास दाखवला आहे. मोदी आणि त्यांच्या नेतृत्वाखालील सरकारने केलेल्या कामावर विश्वास दाखवला आहे, असंही त्यांनी सांगितलं.

तसेच कुणाला कोणतं मंत्रीपद द्यायचं आणि कोणतं नाही, याचा अधिकार पंतप्रधानांनाच आहे, असंही त्यांनी एका प्रश्नाचं उत्तर देताना स्पष्ट केलं. तर बॉलिवूडची एकजूट घडवून आणण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचं अभिनेता विवेक ओबेरॉयने सांगितलं. फिल्मी कलाकार नेहमीच सॉफ्ट टार्गेट असतात त्यामुळे त्यांच्यात एकी असणं आवश्यक असल्याचंही त्याने सांगितलं.

आपलं सरकार