Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

पश्चिम बंगाल मधील मतदानाची निवडणूक आयोगाने खबरदारी घ्यावी , ममतांचे मुख्य निवडणूक आयुक्तांना पत्र

Spread the love

लोकसभा निवडणुकीसाठी उद्या सातव्या आणि अखेरच्या टप्प्याचं मतदान असून  पश्चिम बंगालमढील  मतदान शांततेत पार पडावे , याची दक्षता निवडणूक आयोगाने घ्यावी, असे  पत्र मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी आयोगाला लिहिलं आहे.

कोलकातामध्ये अमित शहा यांच्या रॅलीत झालेल्या हिंसाचाराच्या घटनेनंतर पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी भाजपला लक्ष्य केलं आहे. उद्या होणाऱ्या मतदानाच्या पार्श्वभूमीवर बॅनर्जी यांनी आयोगाला पत्र लिहिले आहे . पश्चिम बंगालमध्ये शांततेत, निःपक्ष आणि कुठल्याही अनुचित घटना न होता मतदान होईल, याची दक्षता आयोगाने घ्यावी. तसंच सत्ताधारी भाजपचा आणि केंद्र सरकारचा कुठल्याही प्रकारचा हस्तक्षेप होऊ नये, असंही ममतांनी पत्रात म्हटलं आहे.

लोकसभा निवडणुकीच्या सातव्या आणि अखेरच्या टप्प्यात उद्या ५९ जागांसाठी मतदान होणार आहे. पश्चिम बंगालमध्येही उद्या ९ जागांसाठी मतदान होणार आहे. डमडम, बारासात, बसीरहाट, जयनगर, मथुरापूर, डायमंड हार्बर, जाधवपूर, कोलकाता दक्षिण आणि कोलकाता उत्तर या मतदारसंघांमध्ये मतदान होईल.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!