Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

Good News : अखेर मान्सून अंदमानात दाखल, यंदा सरासरीपेक्षा जास्त मान्सून , शेतकऱ्यांना यंदाच्या मौसमात मिळू शकतो दिलासा

Spread the love

अखेर मान्सून अंदमानात दाखल झाला आहे. १८ ते १९ मे रोजीपर्यंत मान्सून हा अंदमानात दाखल होणार असल्याचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला होता. त्यानुसार आज पावसानं अंदमानात हजेरी लावली आहे. हवामान विभागाच्या आतापर्यंतच्या अंदाजानुसार, ‘अल निनोचा प्रभाव कमी असेल त्यामुळे यंदा मान्सून सरासरीपेक्षा जास्त असेल अशी शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे शेतकऱ्यांना यंदाच्या मौसमात दिलासा मिळू शकतो.’ यंदा सरासरीच्या ९५ ते १०४ टक्के सामान्यत: मान्सून येण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. स्कायमेटनं दिलेल्या अंदाजानुसार, यावर्षी बंगाल, बिहार, झारखंडमध्ये कमी प्रमाणात पाऊस पडणार आहे. भारतामध्ये पूर्वेला ९२ टक्के पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला असून राजस्थान, गुजरात, महाराष्ट्र आणि पंजाबमध्ये चांगला पाऊस होऊ शकतो. मध्य भारतात मान्सून ५० टक्क्यांपेक्षा कमी होऊ शकतो.

नैऋत्य मोसमी वाऱ्यांनी अंदमान निकोबार बेटं,  अंदमानातील समुद्र आणि दक्षिण बंगालच्या उपसागराचा काही भाग व्यापला आहे. यंदाचा मान्सून हा उशिरा दाखल होणार अशी माहिती स्कायमेटकडून वर्तवण्यात आली होती. तर अंदमानमध्ये १८-१९ मेपर्यंत मान्सून धडकणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला होता.

मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापर्यंत म्हणजे ३० मेपर्यंत मान्सून दाखल होतो. पण यावेळी मान्सून काही दिवस आधीच अंदमानात दाखल झाला आहे. दरम्यान, हवामान विभागाने देशात यंदा चांगला मान्सून होणार असल्याचं म्हटलं आहे. मान्सूनवर अल निनो वादळाचा प्रभाव कमी असू शकतो असंही सांगण्यात आलं होतं.

हवामान खात्याने दिलेल्या अंदाजानुसार, यंदा अल नीनो वादळाचा प्रभाव कमी असणार आहे. जर त्याचा प्रभाव असाच कमी राहिला तर शेतकऱ्यांसाठी यंदाचा मान्सून आनंदाचा आहे. प्रशांत महासागरात, पेरूच्या जवळील किनारपट्टीवर उष्णता वाढते त्याला  अल निनो म्हणतात. गेल्या काही वर्षांपासून प्रशांत महासागराच्या पृष्ठभागाचं तापमान सातत्याने वाढत आहे. मान्सूनवर अल निनो वादळाचा प्रभाव कमी असू शकतो असंही सांगण्यात आलं होतं.

1 thought on “Good News : अखेर मान्सून अंदमानात दाखल, यंदा सरासरीपेक्षा जास्त मान्सून , शेतकऱ्यांना यंदाच्या मौसमात मिळू शकतो दिलासा

  1. वरुण राजा मेहरबानी राहु दया की

Comments are closed.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!