महात्मा गांधी भारताचे नव्हे, पाकिस्तानचे राष्ट्रपिता; भाजपा नेता बरळला आणि पक्षाने केले निलंबित

Advertisements
Advertisements
Spread the love

भाजपचे अध्यक्ष अमित शहा भले काहीही म्हणोत भाजप नेते मात्र आपल्या औकातीवर उतरले आहेत . महात्मा गांधी यांची हत्या करणाऱ्या नथुराम गोडसेला देशभक्त म्हटल्यानं भाजपाच्या उमेदवार साध्वी प्रज्ञा सिंह वादात सापडल्यानंतर  पक्षानं सूचना दिल्यानंतर त्यांनी विधानाबद्दल माफी मागितली खरी आज भाजपाच्या आणखी दोन नेत्यांनी महात्मा गांधी यांच्यासंदर्भात पुन्हा वादग्रस्त विधान केले आहे. यावरुन पुन्हा वाद वाढण्याची चिंन्हे आहेत.

Advertisements

याच मालिकेत महात्मा गांधी भारताचे नव्हे, पाकिस्तानचे राष्ट्रपिता असल्याचं भाजपा नेते अनिल सौमित्र यांनी त्यांच्या फेसबुक पोस्टमध्ये म्हटलं. ‘राष्ट्रपिता होते, पण पाकिस्तानचे. भारतात तर त्यांच्यासारखे कोट्यवधी पुत्र होऊन गेले. काही लायक होते, तर काही नालायक होते,’ अशी वादग्रस्त पोस्ट सौमित्र यांनी केली. ‘काँग्रेसनं त्यांना राष्ट्राचं पिता केलं. राष्ट्राचा कोणीही पिता नसतो. पुत्र असतात. चर्चमध्ये फादर असतात. काँग्रेसनं त्याचं हिंदी रुपांतर केलं,’ असं सौमित्र यांनी म्हटलं.

Advertisements
Advertisements

आपलं सरकार