It seems you're using an unsafe, out-of-date browser. CLOSE(X)

एमआयएम नगरसेवकाविरुद्ध विनयभंगाची तक्रार देणा-या काॅंग्रेसच्या महिला कार्यकर्तीचा मृतदेह सापडल्याने खळबळ

Advertisements

<SCRIPT charset=”utf-8″ type=”text/javascript” src=”//ws-in.amazon-adsystem.com/widgets/q?rt=tf_cw&ServiceVersion=20070822&MarketPlace=IN&ID=V20070822%2FIN%2F19840a8-21%2F8010%2F637dff1b-7428-4e7b-82fe-5ee3099bc298&Operation=GetScriptTemplate”> </SCRIPT> <NOSCRIPT><A rel=”nofollow” HREF=”//ws-in.amazon-adsystem.com/widgets/q?rt=tf_cw&ServiceVersion=20070822&MarketPlace=IN&ID=V20070822%2FIN%2F19840a8-21%2F8010%2F637dff1b-7428-4e7b-82fe-5ee3099bc298&Operation=NoScript”>Amazon.in Widgets</A></NOSCRIPT>

Spread the love

एमआयएमचे सोलापूर शहराध्यक्ष आणि नगरसेवक तौफिक शेख यांच्याविरुद्ध तक्रार देणाऱ्या काँग्रेस कार्यकर्तीची हत्या झाल्याची घटना विजयपूरमध्ये उघडकीस आली आहे. तौफिक शेख यांच्याविरोधात रेश्मा पडेकनूर यांनी १७ एप्रिल रोजी विनयभंग केल्याची तक्रार दिली होती. सदर महिला कार्यकर्तीचा  मृतदेह आढळल्याने एकच खळबळ उडाली आहे. पोलीस या प्रकरणात अधिक तपास करीत आहेत.

काँग्रेस कार्यकर्त्या रेश्मा पडेकनूर आणि एमआयएम नगरसेवक तौफिक शेख यांच्यामध्ये मागील काही वर्षांपासून वाद सुरु होता. लोकसभा निवडणुकीच्या दरम्यान रेश्मा यांनी तौफिक शेख यांच्याविरोधात विनयभंगाची तक्रार दिली होती. त्यानंतर काही दिवसांनी त्या बेपत्ता झाल्या.

Advertisements


Advertisements

विजयपूरजवळ असलेल्या कोलार गावात काल संध्याकाळी सात वाजता रेश्मा यांचा मृतदेह सापडला. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेतला असून विजयपूरमध्ये शवविच्छेदनसाठी आणण्यात आला आहे. याप्रकरणी अज्ञाताविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

विविधा