Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

लज्जास्पद : विकृत मुलाने केला आईवरच बलात्कार !! वडिलांनाही मारहाण, मुलाला तत्काळ अटक

Advertisements
Advertisements
Spread the love

वाई तालुक्यात आई-मुलाच्या नात्याला काळिमा फासणारी घटना घडली आहे. मुलाने आपल्या जन्मदात्रीवरच बलात्कार केला आहे. पीडित आईला वाचविण्यासाठी पुढे आलेल्या वडिलांनाही नराधम मुलाने दगडाने मारहाण केली आहे. या प्रकरणी भूईंज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Advertisements

मिळालेली माहिती अशी की, सातारा जिल्हयातील वाई तालुक्यातल्या एका गावात मुलानेच आपल्या आईवर बलात्कार केल्याची घटना घडली आहे. यामध्ये वडिलांनी हस्तक्षेप केल्यानंतर त्यांनाही मुलाने दगडाने मारहाण करून जखमी केले आहे. या घटनेमुळे वाई तालुक्यात संताप व्यक्त केला जात आहे. या प्रकरणी भुईंज पोलिस ठाण्यात नराधमाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Advertisements
Advertisements

माणुसकिला काळिमा फासणारी घटना वाई तालुक्यात घडली आहे. पोटच्या मुलानेच आईवर बलात्कार केल्याने परिसरात चांगलीच खळबळ उडाली आहे. संदीप सूर्यवंशी असं नराधम मुलाचे नाव आहे. संशयित मुलाची आई आणि वडील एका लग्नाच्या कार्यक्रमाला गावात गेले होते. तेथील गावदेव करून झाल्यावर आरोपीची आई एकटीच घरी पुढे आली. यावेळी आरोपी मुलगा संदीप हा घराच्या ओट्यावर बसला होता.आई घरात गेल्यानंतर तो ही घरात गेला व त्याने आतून कढी लावली. यावेळी त्याने जबरदस्ती करत स्‍वता:च्या आईवरच बलात्कार केला. त्याच्या आईने आरडाओरडा केला शेजारच्या लोकांनी या घटनेची माहिती आरोपीच्या वडिलांना दिली. त्याच्या वडिलांनी मुलाला केलेल्‍या कृत्‍याचा जाब विचारला असता मुलाने वडिलांनाही दगड मारून जखमी केले. घडलेल्या घटनेनंतर पीडित महिलेने भुईंज पोलिस ठाण्यात स्‍वता:च्या मुलाने केलेल्‍या या घृणास्‍पद कृत्‍याची माहिती दिली. या घटनेनंतर संशयित आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!