News Updates : गल्ली ते दिल्ली , एक नजर , महत्वाच्या बातम्या …

Advertisements
Advertisements
Spread the love

1. राज्य मंत्रिमंडळाची उद्या दुपारी बैठक. मराठा समाजाच्या विद्यार्थ्यांना पदव्युत्तर वैद्यकीय अभ्यासक्रमात पूर्वलक्षी प्रभावाने आरक्षण देण्यासंदर्भातील वटहुकूमच्या मसुद्यास देणार मंजुरी.

Advertisements

2. नथुराम गोडसेवरील साध्वी प्रज्ञासिंहच्या वक्तव्याप्रकरणी निवडणूक आयोगाने अहवाल मागितला

Advertisements
Advertisements

3. औरंगाबाद: एसटी बस चालक पांडूरंग वाघमारे यांचा उपचारादम्यान घाटी रुग्णालयात मृत्यू, सीबीएस आगारात बस आणल्यानंतर प्रकृती बिघडली होती

4. औरंगाबाद: आपेगाव-हिरडपुरी बंधाऱ्यात पाणी सोडण्याची शेतकऱ्यांची मागणी, संतापलेल्या शेतकऱ्यांनी गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळात कोंडून घेतले

5. औरंगाबादः परीक्षा संचालक डॉ. जी. आर. मंझा यांचा राजीनामा, अंतर्गत दबावातून राजीनामा दिल्याची चर्चा, कुलगुरू आल्यानंतर अंतिम निर्णय

6. ‘गोडसे देशभक्त’ वक्तव्यावर साध्वी प्रज्ञासिंहची अखेर माफी , पक्षाच्या विचारधारेशी बांधील असल्याचं स्पष्टीकरण, म्हणाली पार्टीची लाईन तीच माझी लाईन मीप क्षाचीकार्यकर्ता.

7. कोलकाताः ईश्वरचंद विद्यासागर राव यांच्या पुतळ्याच्या विटंबनेप्रकरणी एसआयटी स्थापन

8. नागपूरः सरसंघचालक मोहन भागवत यांच्या ताफ्यातील सुरक्षा राक्षकांचं वाहन उलटले, १ जवान गंभीर जखमी

9. परभणी : गंगाखेडमध्ये वरातीत डीजे लावण्यावरून दगडफेक; वरपक्षाकडचे १२ जण जखमी

10. मुंबईः अतिरिक्त पोलीस महासंचालक देवेन भारती यांनी महाराष्ट्र एटीएसची सूत्रं स्वीकारली

11. गडचिरोली: १९ मे रोजी जिल्हा बंदचं नक्षलवाद्यांचं बॅनरमधून आवाहन, बॅनरमुळे दुर्गम भागात दहशतीचे सावट

12. प्रत्येकाच्या खात्यात पंधरा लाख रुपये जमा करणार असे पंतप्रधान म्हणाले होते. निवडणुकीनंतर भाजप अध्यक्षांनी सांगितलं की तो जुमला होता. आता पुन्हा तुम्ही त्यांच्यावर विश्वास ठेवणार का? : प्रियांका गांधी, काँग्रेस

13. जालना : रामखेडा खूनप्रकरणात फिर्यादी पिताच निघाला मुलाचा खुनी; हनुमान कुरधने याला पोलिसांनी केली अटक

14. मुंबई : देवेन भारतींनी एटीएस प्रमुख पदाचा पदभार स्वीकारला, अतुलचंद्र कुलकर्णी पुण्याला रवाना.

15. औरंगाबाद: दुष्काळप्रश्नी भाजप सरकार गंभीर नाही, काँग्रेस नेते बसवराज पाटील यांचा आरोप

16. औरंगाबाद : पाण्याच्या मागणीसाठी घरी आलेल्या नागरिकास नगरसेवक नितीन चित्ते यांच्याकडून मारहाण

17. अहमदनगरः जामखेडमधील जिल्हा परिषद शाळेच्या शिक्षिका विजया वराट (वय ४०) यांची मध्यरात्री राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या

18. काही लोक खोटं बोलून आणि अफवा पसरवून शेतकऱ्यांची दिशाभूल करत आहेत. – पंतप्रधान नरेंद्र मोदी

19. औरंगाबाद: संग्रामनगर रेल्वे क्रॉसिंगजवळ ट्रेनसमोर उडी घेऊन सूरज भंडारे (वय-१९, रा. उमरी, ह. मु. सातारा परिसर) या तरुणाची आत्महत्या

20. पुणे: डॉ. गणेश देवी, न्या. नरेंद्र चपळगावकर, श्रीराम पवार, डॉ. द. ता. भोसले, डॉ. अश्विनी धोंगडे, वर्षा गजेंद्रगडकर, रेखा बैजल, डॉ. नीलिमा गुंडी यांना महाराष्ट्र साहित्य परिषदेची वार्षिक ग्रंथ पारितोषिके जाहीर

21. पुणे: डॉ. दत्तप्रसाद दाभोळकर, विजया वाड, आरती कदम, किसन महाराज साखरे, सदा डुंबरे, छाया महाजन, डॉ. राजा दीक्षित, जितेंद्र जोशी, राजीव तांबे, मुकुंदराज कुलकर्णी यांना महाराष्ट्र साहित्य परिषदेचे विशेष ग्रंथकार पुरस्कार जाहीर

22. पुणे: मावळ शाखेला उत्कृष्ट मसाप शाखा पुरस्कार आणि नाशिक रोड शाखेला वैशिष्ट्यपूर्ण शाखा पुरस्कार, रावसाहेब पवार आणि नरेंद्र फिरोदिया यांना ‘मसाप कार्यकर्ता’ पुरस्कार

23. पुणे: दिलीप माजगावकर यांना महाराष्ट्र साहित्य परिषदेचा जीवनगौरव पुरस्कार, तर नोहा मस्सील यांना भीमराव कुलकर्णी कार्यकर्ता पुरस्कार, २७ मे रोजी पुरस्कार प्रदान करणार

24. यवतमाळ : पालकमंत्र्यासह 16 जणांवर फौजदारी गुन्हे दाखल करण्याचे न्यायालयाचे आदेश

आपलं सरकार