खोटे बोलताना तुम्हाला लाज वाटत नाही नाही का ? आरोप सिद्ध करा अन्यथा उठा- बशा काढा : ममता बॅनर्जी

Advertisements
Advertisements
Spread the love

अमित शहा यांच्या रोड शो नंतर पश्चिम बंगालचं राजकीय वातावरण चांगलंच पेटलं आहे . मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी आज पुन्हा भाजपवर तोफ डागली ममता म्हणाल्या कि , ईश्वरचंद्र विद्यासागर यांचा पुतळा फोडण्यात आला. हा प्रकार तृणमूलच्या गुंडांनी केल्याचा आरोप पंतप्रधान मोदी आणि अमित शहा करीत आहेत. खोटं बोलायला तुम्हाला लाज वाटत नाही का ? आम्ही ईश्वरचंद्र विद्यासागर यांचा पंचधातुचा पुतळा उभारू अशी घोषणा मोदींनी केली आहे  मात्र जो २०० वर्षांपासूनचा वारसा होता तो मोदी परत करू शकतात का ? तसेच तृणमूलच्या कार्यकर्त्यांवर मोदी पुतळा फोडल्याचा आरोप करत आहेत. हा आरोप सिद्ध झाला नाही तर मोदी जनतेसमोर उठाबशा काढणार का? त्यांनी उठाबशा काढल्या नाहीत तर मी त्यांना तुरुंगात धाडेन असाही इशारा ममता बॅनर्जींनी दिला.

Advertisements

पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सातत्याने खोटं बोलत आहेत असाही आरोप ममता बॅनर्जींनी केला आहे. तृणमूलच्या कार्यकर्त्यांवर तुम्ही आरोप केले आहेत ते ठीक आहे. आरोप सिद्ध करून दाखवा नाहीतर मी तुम्हाला तुरुंगात धाडेन असा इशाराही ममता बॅनर्जींनी दिला आहे. गेल्या काही दिवसांपासून ममता बॅनर्जी आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यात शाब्दिक चकमक रंगताना दिसते आहे. ममता बॅनर्जी यांच्यावर टीका करताना त्यांनी याआधीही मोदींनीही त्यांच्यावर निशाणा साधला. आता ममता बॅनर्जींनी मोदी यांना उदाहरण देऊन टीका केली आहे.

Advertisements
Advertisements

आपलं सरकार