भरधाव कारच्या धडकेत पुण्यात तीन ठार

Advertisements
Advertisements
Spread the love

पुण्यातील विमान नगर येथे चारचाकी गाडीने भरधाव वेगात दुचाकीला दिलेल्या धडक दिली. या अपघातात मुलगा, वडील यांच्यासह शेजारच्या मुलाचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. याप्रकरणी अपघाताला जबाबादार असणाऱ्या अज्ञात चालकाविरूध्द विमानतळ पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. नरसय्या येरय्या शेट्टी (वय 37),यशवंत नरसय्या शेट्टी (वय 12)व अशपाक सलीम सय्यद (वय12 सर्व रा.कलवडवस्ती लोहगाव)या तिघांचा गंभीर अपघातात मृत्यू झाला.
विमानतळ पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नरसय्या हे आपला मुलगा यशवंत व शेजारी राहणाऱ्या अशपाक यांना दुचाकीवरुन (एम एच ०२ बीसी ८९०७) घेवून जात असताना बुधवारी (दि. १५)रोजी सायंकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास भरधाव वेगाने येणाऱ्या कारने त्यांना धडक दिली. या अपघातानंतर कारचालक फरार झाला. या अपघातात तिघेही गंभीर जखमी झाले होते. पोलिसांनी त्यांना उपचारासाठी ससून रूग्णालयात दाखल केले.नरसय्या व यशवंत यांचा  बुधवारी मध्यरात्रीच्या सुमारास तर अशपाक यांचा गुरूवारी सकाळी उपचारादरम्यान मृत्यू झाला. याप्रकरणी विमानतळ पोलिसांनी अपघात करणाऱ्या अज्ञात चालकाविरूध्द गुन्हा दाखल केला आहे.विमानतळ पोलिसांनी सीसीटिव्ही फुटेजवरून कारचा शोध घेऊन ती ताब्यात घेतली आहे. या अपघाताचा अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक सलिम चाऊस करत आहेत.

Advertisements

आपलं सरकार