काश्मीरमध्ये १२ तासांत ६ दहशतवाद्यांचा खात्मा

Advertisements
Spread the love

दक्षिण काश्मीरमधील शोपियांजिल्ह्यात दहशतवादी आणि सुरक्षा दलांमध्ये झालेल्या चकमकीत तीन दहशतवादी मारले गेल्याचे वृत्त आहे. गुरुवार सकाळपासून दहशतवाद्यांबरोबर सुरू असलेल्या चकमकीत गेल्या १२ तासांत ६ दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात लष्कराला यश आले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, शोपियां जिल्ह्यात लष्कराचे गस्ती पथकअरीपाल भागातून जात होते.

सायंकाळी ४ वाजता या पथकावर दहशतवाद्यांकडून गोळीबार करण्यात आला. या गोळीबाराला लष्कराच्या गस्ती पथकाने चोख प्रत्युत्तर दिले. या चकमकीत तीन दहशतवादी मारले गेला. यानंतर या भागात जम्मू काश्मीर पोलिसांच्या सहकार्याने शोधमोहीम हाती घेण्यात आली आहे. या भागाला सुरक्षा दलांनी चारही बाजूने वेढाही घातला आहे.

दरम्यान, पुलवामा येथे सकाळी झालेल्या चकमकीत ३ दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात सुरक्षा दलाच्या जवानांना यश आले. या चकमकीदरम्यान सुरक्षा दलाचा एक जवान शहीद झाला असून दोन जवान जखमी झाल्याचे सांगण्यात आले.

Leave a Reply