पुण्यात पाच मजली इमारतीला आग, २५ जणांची सुटका

Advertisements
Spread the love

पुण्यात शनिवार पेठेतील प्रभात टॉकीजसमोर एका इमारतीत आज सकाळी भीषण आग लागली. त्यामुळे इमारतीत एकच धावपळ उडाली. मात्र अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी तात्काळ धाव घेऊन आग नियंत्रणात आणल्याने मोठी हानी टळली. यावेळी अग्निशमन दलाने या आगीतून २५ जणांची सुटकाही केली. सुदैवाने या आगीत कोणतीही जीवितहानी झाली नाही.

पुण्यातील प्रभात सिनेमाच्या गल्लीतील जोशी संकूल या ५ मजली इमारतीला आज सकाळी आग लागली. त्यामुळे इमारतीतील रहिवाश्यांमध्ये एकच घबराट निर्माण झाली आणि रहिश्यांची धावपळ सुरू झाली. आग लागल्यानंतर काही वेळाने धूराचे लोळही इमारतीत पसरल्याने रहिवाशी अधिकच भयभीत झाले. त्यानंतर अग्निशमन दलाच्या ७ गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आणि त्यांनी अवघ्या अर्धा-पाऊण तासातच आगीवर नियंत्रण मिळविले. यावेळी अग्निशमन दलाच्या जवानांनी २५ जणांची आगीतून सुटका केली. या आगीत कोणतीही जीवितहानी झाली नसल्याचं अग्निशमन दलाच्या सूत्रांनी सांगितलं. दरम्यान, या ठिकाणी कूलिंग ऑपरेशन सुरू आहे.

Leave a Reply