Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

बोफोर्स चौकशी : सीबीआयला आली जाग , तपासाला न्यायालयाची परवानगी

Spread the love

बोफोर्स प्रकरणात काही महत्त्वाचे पुरावे आणि नोंदी हाती लागल्याने या प्रकरणाच्या पुढील तपास सुरू ठेवण्याचा निर्णय केंद्रीय अन्वेषण विभागाने (सीबीआय) घेतला आहे. बोफोर्स प्रकरणाचा तपास पुढे सुरू ठेवण्यासाठी सीबीआयने मुख्य महानगर न्यायदंडाधिकारी यांच्याकडून परवानगी मागितल्याची माहिती मिळाली आहे.

यासंदर्भात सीबीआयचे प्रवक्ते नितीन वकनकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, मिशेल हार्शमन नामक व्यक्तीने केलेल्या महत्त्वाच्या खुलाशानंतर सीबीआयने न्यायालयाकडे बोफोर्स प्रकरणाचा तपास पुढे सुरू ठेवण्यासाठी परवानगी मागितली होती. यासंदर्भात दाखल केलेल्या याचिकेवर सुनावणी करताना न्यायालयाच्या परवानगीची सीबीआयला आवश्यकता नाही. मात्र, बोफोर्स प्रकरणाच्या तपासाची माहिती वेळोवेळी न्यायालयाला देत राहणे आवश्यक असल्याचे निर्देश न्यायालयाने सीबीआयला दिले आहेत. त्यामुळे बोफोर्स प्रकरणाचा तपास पुढे सुरू राहणार आहे, अशी माहिती त्यांनी दिली.

दरम्यान, १ फेब्रुवारी २०१८ रोजी बोफोर्स प्रकरणाची याचिका मागे घेण्याबाबत सीबीआयने न्यायालयाला विनंतीकेली होती. मात्र, नव्या गोष्टी समोर आल्याने सीबीआयने सदर याचिका मागे घेण्याचा निर्णय घेतल्याचे समजते.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!