News Updates : गल्ली ते दिल्ली , एक नजर , रात्रीच्या बातम्या …

Advertisements
Advertisements
Spread the love

1. मुंबईः राज्यातील दुष्काळी परिस्थितीवर चर्चा करण्यासाठी शरद पवार यांनी घेतली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट; माजी उपमुख्यमंत्री अजित पवारांचीही उपस्थिती

Advertisements

2. लोकसभा निवडणुकांच्या एग्झिट पोलसदंर्भातील सर्व ट्विट हटवा; निवडणूक आयोगाची ट्विटरला सूचना

Advertisements
Advertisements

3. कोलकाताः प्रचाराची वेळ कमी करणे, हा आयोगाचा नाही मोदींचा निर्णय, अमित शहा यांच्या धमकीमुळे निवडणूक आयोगाने प्रचार वेळ कमी केली; ममता बॅनर्जी यांची टीका

4. मुंबईः राज्यातील दुष्काळी परिस्थितीवर चर्चा करण्यासाठी शरद पवार यांनी घेतली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट; माजी उपमुख्यमंत्री अजित पवारांचीही उपस्थिती

5. वाराणसीः प्रियंका गांधी यांनी भैरव मंदिरात केली पूजा

6. दिल्लीः आयसीआयसीआय-व्हिडिओकॉनप्रकरणी काढलेल्या लूक आऊट नोटीस विरोधात राजीव कोचर उच्च न्यायालयात दाखल; नोटीस रद्द करण्याची मागणी

7. कर्नाटकः मंगळुरू विमानतळावर एक किलो सोन्यासह एका व्यक्तीला अटक

8. पुणेः राज्याचे माध्यमिक शिक्षण संचालनालयाचे संचालक गंगाधर म्हमाणे यांचा मुलगा श्रीशैल गंगाधर म्हमाणे याचे सोलापूरमध्ये आकस्मात निधन

9. औरंगाबादः दुष्काळाच्या दाहकतेचे सरकारला गांभीर्य नाही; शेतकरी, नागरिकांनी मांडल्या काँग्रेस आमदार बसवराज पाटील यांच्यासमोर व्यथा

10. औरंगाबाद: कारमधून इंजिनचे ऑईल गळत असल्याचे सांगून कारमध्ये ठेवलेली पाच लाखांची रोकड पळवल्याप्रकरणी संजय मुनियांदी, बबलू फकिरा, किसन सेलुराज, करण गणेश व अभिमन्यू बबलू यांना अटक व सोमवारपर्यंत पोलीस कोठडी

11. पुणेः अॅड. युवराज ननावरे यांना आत्महत्या करण्यास प्रवृत्त केल्याप्रकरणी दाखल गुन्ह्यात अटक करण्यात आलेला आरोपी अभय रामचंद्र कुलकर्णी याचा जामीन अर्ज कोर्टाने फेटाळला

12. औरंगाबादः पशुधनासाठी पाणी आणणे, लांब अंतरावरून चारा आणणे यासाठी वाहतूक खर्च वाढत असल्यामुळे चारा छावणी चालकांना देण्यात येणाऱ्या अनुदानात दहा रुपये वाढ : मंत्रिमंडळ उपसमितीचा निर्णय

13. औरंगाबाद: बनावट मृत्यू प्रमाणपत्रे व कागदपत्रे सादर करुन ‘एलआयची’च्या जनश्री योजनेअंतर्गत ९९ लाख ३० हजार रुपयांच्या मृत्यू दाव्याच्या रकमेचा गैरव्यवहार केल्याप्रकरणात सुभान अहमद शाह व शकील शाह अहमद शाहला अटक व सोमवारपर्यंत पोलीस कोठडी

14. दिल्लीः पश्चिम बंगालमध्ये अमित शहा यांच्या रोड शो दरम्यान उसळलेल्या हिंसाचाराप्रकरणी भाजपच्या शिष्टमंडळने घेतली उपराष्ट्रपती वैंकय्या नायडू यांची भेट

15. नागपूर येथील संविधान चौकात ममता बॅनर्जी यांचा पुतळा दहन करुन भारतीय जनता युवा मोर्चाच्या कार्यकर्त्यांकडून निषेध

16. औरंगाबादः पंधरा दिवसात वॉर्डातील कामे सुरू न झाल्यास ठिय्या आंदोलन करण्याचा नगरसेवकांचा इशारा

17. शिर्डीः श्रीरामपुरात दरोडा; १० लाखांचे दागिने लुटले

18. श्रीरामपूरमध्ये शिक्षिकेची आत्महत्या, चिट्ठीत लिहिली दोघांची नावे

१९. कंगनाच्या विरोधात आदित्य पांचोलीने दाखल केला एफ आयआर.

२०. काँग्रेसच्या पत्रकार परिषदेत भाजपा समर्थकाचे वंदे मातरमचे नारे

 

आपलं सरकार