सहाव्या टप्प्यातच आम्ही २७२, सातव्या टप्प्यानंतर भाजपा ३००चा आकडा ओलांडेल : अमित शहा

Advertisements
Advertisements
Spread the love

सातव्या टप्प्यानंतर भाजपा ३००चा आकडा ओलांडेल. सहाव्या टप्प्यातच आम्ही २७२ ची ‘मॅजिक फिगर’ गाठली आहे. त्यामुळे यावेळीही भाजपा स्वबळावर सरकार स्थापन करू शकेल’, असं अमित शहा यांनी ठामपणे सांगितलं. देशभरात दौरे केल्यानंतर जे चित्र पाहिलं, त्या आधारे आपण हा अंदाज बांधत असल्याचं त्यांनी सांगितलं. ममता बॅनर्जी यांची ‘दीदीगिरी’ असलेल्या पश्चिम बंगालमध्येही ४२ पैकी २३ हून अधिक जागांवर ‘कमळ’ फुलेल, असंही त्यांनी सांगितलं.

Advertisements

लोकसभा निवडणुकीच्या मतदानाचे सहा टप्पे पूर्ण झालेत. ५४३ पैकी ४८४ मतदारसंघांमध्ये उमेदवारांचं भवितव्य यंत्रबद्ध झालं आहे. आता येत्या १९ तारखेला उर्वरित ५९ जागांवर मतदान होणार आहे. त्यात उत्तर प्रदेश आणि पंजाबमधील प्रत्येकी १३, पश्चिम बंगालमधील ९, बिहारमधील ८, मध्य प्रदेशातील ८ जागांचा समावेश आहे. स्वाभाविकच, हा टप्पा सर्वच पक्षांसाठी ‘लास्ट बट नॉट द लीस्ट’ स्वरूपाचा आहे. परंतु, भाजपानं सहाव्या टप्प्यातच बहुमताचा आकडा पार केला असल्याचा दावा पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी केला आहे. त्यांनी सांगितलेला आकडा रालोआतील मित्रांचं टेन्शन वाढवणारा आहे.

Advertisements
Advertisements

दरम्यान, अमित शहा यांच्या पश्चिम बंगालमधील रोड शोला हिंसक वळण लागलं होतं. दगडफेक, जाळपोळीचे प्रकार घडले होते. हा हिंसाचार ममतादीदींच्या तृणमूल काँग्रेसनेच घडवल्याचा आरोप अमित शहा यांनी केला. ‘आम्ही देशभरात निवडणूक लढवली. पण कुठेच हिंसाचार झाला नाही. कारण तिथे तृणमूल काँगेस नाही. फक्त पश्चिम बंगालमध्ये हिंसाचार झाला, तो केवळ तृणमूल सत्तेत असल्यानेच, असं शरसंधान शहांनी केलं. दीदी, तुम्ही स्वतःला देव समजू नका. तुमचं शासन जनताच संपवेल, असंही त्यांनी सुनावलं. भर भाषणात बदला घेण्याची धमकी देणाऱ्या ममतादीदींवर निवडणूक आयोगाने कुठलीही कारवाई केलेली नाही, हा दुटप्पीपणा असल्याचा आरोपही शहांनी केला.

आपलं सरकार