Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

निवडणूक आयोगाचा ट्विटर इंडियाला आदेश, एक्झिट पोलचे सर्व ट्विट हटवा

Spread the love

लोकसभा निवडणुकीचं सातव्या टप्प्यातील मतदान बाकी असतानाच सोशल मीडियावर विशेषत: ट्विटरवर एक्झिट पोल संदर्भातील ट्विट झळकू लागल्याने त्याची गंभीर दखल घेत केंद्रीय निवडणूक आयोगाने कारवाईचे पाऊल उचलले आहे. ‘लोकसभा निवडणूक २०१९’च्या एक्झिट पोलसंदर्भात असलेले सर्व ट्विट तत्काळ हटवण्यात यावेत, असे स्पष्ट आदेश निवडणूक आयोगाने ट्विटर इंडियाला दिले आहेत. ट्विटर इंडियाकडून मात्र याबाबत कोणतीही प्रतिक्रिया देण्यात आलेली नाही. ट्विटरवर प्रचंड संख्येने एक्झिट पोलशी संबंधित ट्विट असून या पोस्ट डीलीट करण्याचे मोठे आव्हान ट्विटरपुढे असणार आहे.

दुसरीकडे १९ मे रोजी सातव्या टप्प्यातील मतदान संपल्यानंतर एक्झिट पोल प्रसिद्ध करण्यास मात्र निवडणूक आयोगाने माध्यमांना परवानगी दिली आहे. दरम्यान, तीन माध्यम समूहांनाही  निवडणूक आयोगाने एक्झिट पोलवरून नोटीस बजावली असून ४८ तासांत त्यावर स्पष्टीकरण मागितलं आहे.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!