Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

नेत्रहिनांनाही चलनी नोटा नोटा ओळखणे सोयीचे व्हावे म्हणून रिझर्व्ह बँकेचे प्रयत्न

Spread the love

नेत्रहिनांना चलनी नोटा ओळखण्यासाठी मदत व्हावी या हेतूने रिझर्व्ह बँक मोबाइल अॅप तयार करण्याचा विचार करीत आहे. यासाठीचा प्रस्तावही बँकेने तयार केला आहे. सध्या देशात १० रुपये, २० रुपये ५० रुपये, १०० रुपये, २०० रुपये, ५०० रुपये आणि २००० रुपयांच्या नोटा चलनात आहेत. या शिवाय केंद्र सरकारतर्फे एक रुपयाचीही नोट जारी करण्यात आली आहे. अंध आणि दृष्टिहिनांना ओळखता याव्यात यासाठी रिझर्व्ह बँकेतर्फे १०० रुपये आणि त्यापुढील नोटांची छपाई ‘इंटाग्लिओ प्रिंटिंग’मध्ये करण्यात आली आहे. मात्र, १०० रुपयांच्या खालील नोटांची छपाई ‘इंटाग्लिओ प्रिंटिंग’मध्ये नसल्याने त्या ओळखणे दृष्टिहिनांना अवघड जाते.

नोटा ओळखण्यासाठीच्या अॅपची निर्मिती करण्यासाठी रिझर्व्ह बँकेने विविध कंपन्यांना निमंत्रित केले आहे. कंपन्यांना दिलेल्या सूचनेनुसार अॅप महात्मा गांधी जुन्या आणि नव्या सीरिजच्या समोर ठेवले असता, मोबाइलच्या मदतीने नोटा ओळखण्यास ते सक्षम असण्याची गरज आहे. या शिवाय हे अॅप कोणत्याही प्ले स्टोअरमध्ये आवाजाच्या मदतीनेही ओळखता यावे, अशी त्याची रचना असावी. या अॅपने अवघ्या दोन सेकंदांच्या आत संबंधित नोट ओळखण्याची गरज असून, ते इंटरनेटशिवाय चालणारे असावे, अशाही सूचना रिझर्व्ह बँकेने संबंधित कंपन्यांना दिल्या आहेत.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!