It seems you're using an unsafe, out-of-date browser. CLOSE(X)

कर्करोग रुग्णांचे वाढते प्रमाण आरोग्य क्षेत्रासमोरील सर्वांत मोठे आव्हान, २०४० पर्यंत एक लाख कर्करोगतज्ज्ञ डॉक्टरांची गरज

Advertisements

<SCRIPT charset=”utf-8″ type=”text/javascript” src=”//ws-in.amazon-adsystem.com/widgets/q?rt=tf_cw&ServiceVersion=20070822&MarketPlace=IN&ID=V20070822%2FIN%2F19840a8-21%2F8010%2F637dff1b-7428-4e7b-82fe-5ee3099bc298&Operation=GetScriptTemplate”> </SCRIPT> <NOSCRIPT><A rel=”nofollow” HREF=”//ws-in.amazon-adsystem.com/widgets/q?rt=tf_cw&ServiceVersion=20070822&MarketPlace=IN&ID=V20070822%2FIN%2F19840a8-21%2F8010%2F637dff1b-7428-4e7b-82fe-5ee3099bc298&Operation=NoScript”>Amazon.in Widgets</A></NOSCRIPT>

Spread the love

कर्करोगाचे प्रमाण येत्या काही वर्षांमध्ये प्रचंड वाढणार असून, २०४०पर्यंत जगभरातील सुमारे १.५ कोटी रुग्णांना केमोथेरपी घ्यावी लागेल. या रुग्णावर उचपार करण्यासाठी सुमारे एक लाख कर्करोगतज्ज्ञ डॉक्टरांची गरज असेल. यापैकी सर्वाधिक रुग्ण अल्प-मध्यम उत्पन्न गटातील नागरिकांचे प्रमाण सर्वाधिक  असलेल्या देशांमधले असतील, असे शास्त्रज्ञांनी एका संशोधनांती सांगितले असल्याचे वृत्त आहे .

लँसेट ऑन्कोलॉजी जर्नलमध्ये प्रसिद्ध करण्यात आलेल्या निरीक्षणानुसार २०१८ ते २०४० या काळामध्ये केमोथेरपी घेण्याऱ्या रुग्णांचे प्रमाण दरवर्षी ५३ टक्क्यांनी वाढेल. २०४०पर्यंत कर्करोग झालेल्या रुग्णांची संख्या १.५ कोटींच्या घरात गेलेली असेल. कर्करोग रुग्णांच्या वाढत्या संख्येला त्याच प्रमाण उपचार उपलब्ध व्हावेत यासाठी राष्ट्रीय, प्रदेशिक आणि जागतिक पातळीवर काय उपाययोजना कराव्या लागतील, याचा आढावा घेण्यासाठी हे संशोधन करण्यात आले आहे. सिडनीतील न्यु साऊथ वेल्स, इनहॅम इन्स्टिट्यूट फॉर अप्लाइड मेडिकल रिसर्च, किंगहॉर्न कॅन्सर सेंटर, ऑस्ट्रेलियातील लिव्हरपूल कॅन्सर थेरपी सेंटर आणि लिऑन येथील कॅन्सरबाबत संशोधन करणाऱ्या संस्थेतील शास्त्रज्ञांनी हे संशोधन केले आहे.

Advertisements


Advertisements

भविष्यात कर्करोग रुग्णांचे वाढणारे प्रमाण लक्षात घेता रुग्णालयांना कशी तयारी करावी लागेल? तसेच जास्तीत जास्त रुग्णांपर्यंत सेवा पोहोचण्याच्या दृष्टीने तयारी करण्यासाठी आम्ही केलेल्या संशोधनाची मदत होईल. तसेच २०४०पर्यंत किती कर्करोग तज्ज्ञांची गरज भासू शकते. याचाही अंदाज या संशोधनामुळे येऊ शकतो, असे न्यु साऊथ वेल्स विद्यापीठातील शास्त्रज्ञ ब्रूकी विल्सन म्हणाल्या. कर्करोग रुग्णांचे वाढते प्रमाण आज आरोग्य क्षेत्रासमोरील सर्वांत मोठा आणि भविष्यात उग्र रूप धारण करणारा प्रश्न असल्याचेही त्या म्हणाल्या.

विविधा