Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

हिंदूंच्या धार्मिक भावना भडकवल्याच्या आरोपावरून कमल हासन यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल

Spread the love

अभिनेते आणि मक्क्ल निधी मय्यम पक्षाचे संस्थापक कमल हासन यांच्यावर हिंदूंच्या धार्मिक भावना भडकवल्याच्या आरोपावरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दोन दिवसांपूर्वी त्यांनी ‘राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची हत्या करणारा नथुराम गोडसे हा स्वातंत्र्योत्तर भारतातील पहिला हिंदू दहशतवादी होता,’ असे  अभिनेते आणि मक्क्ल निधी मय्यम पक्षाचे संस्थापक कमल हासन यांच्यावर हिंदूंच्या धार्मिक भावना भडकवल्याच्या आरोपावरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दोन दिवसांपूर्वी त्यांनी ‘राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची हत्या करणारा नथुराम गोडसे हा स्वातंत्र्योत्तर भारतातील पहिला हिंदू दहशतवादी होता,’ असे विधान केले होते. हे विधान त्यांना भोवले आहे.

चेन्नईतील अरिवाकुरुची विधानसभा पोटनिवडणुकीच्या प्रचारसभेत बोलताना कमल हासन यांनी रविवारी रात्री हे वक्तव्य केले. यानंतर त्यांच्यावर टीकेची झोड उठली होती. हिंदू सेनेचे अध्यक्ष विष्णू गुप्ता यांनी कमल हासन यांच्याविरोधात तक्राल दाखल केली. या तक्रारीवरून कमल हासन यांच्याव भारतीय दंड संहितेच्या (आयपीसी) कलम १५३ (अ) आणि २९५ (अ) अंतर्गत तक्रार दाखल करण्यात आली आहे.  दिल्लीच्या पतियाळा हाऊस कोर्टात या तक्रारीवर १६ मे रोजी सुनावणी घेण्यात येणार आहे. दरम्यान, या वादात अडकल्यानंतर कमल हासन यांच्या सर्व प्रचारसभा रद्द झाल्या आहे. त्यांनी विविध संघटनांकडून धमक्या येत आहेत.

‘नथुराम गोडसे हा महात्मा गांधी यांची हत्या करणारा स्वतंत्र भारतातील पहिला दहशतवादी होता आणि तो हिंदू होता. इथे मुस्लिमांची लोकसंख्या अधिक आहे म्हणून मी हे बोलत नाही. तर महात्मा गांधीच्या पुतळ्याखाली उभा असल्याने मी हे बोलत आहे,’ असे हासन म्हणाले होते.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!