It seems you're using an unsafe, out-of-date browser. CLOSE(X)

रुग्ण शुल्कात सवलत देण्याच्या बहाण्याने सायं रुग्णालयात महिलेवर बलात्कार

Advertisements

<SCRIPT charset=”utf-8″ type=”text/javascript” src=”//ws-in.amazon-adsystem.com/widgets/q?rt=tf_cw&ServiceVersion=20070822&MarketPlace=IN&ID=V20070822%2FIN%2F19840a8-21%2F8010%2F637dff1b-7428-4e7b-82fe-5ee3099bc298&Operation=GetScriptTemplate”> </SCRIPT> <NOSCRIPT><A rel=”nofollow” HREF=”//ws-in.amazon-adsystem.com/widgets/q?rt=tf_cw&ServiceVersion=20070822&MarketPlace=IN&ID=V20070822%2FIN%2F19840a8-21%2F8010%2F637dff1b-7428-4e7b-82fe-5ee3099bc298&Operation=NoScript”>Amazon.in Widgets</A></NOSCRIPT>

Spread the love

मुंबईच्या सायन रुग्णालयात एका ३७ वर्षीय महिलेवर बलात्कार झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या प्रकरणी सायन पोलिसांनी दीपक अन्नाप्पा कुंचीकुर्वे (३१) या आरोपीला अटक केली आहे. आरोपी दीपक कुंचीकुर्वे धारावी येथे रहायला असून तो रुग्णालयात झाडलोट करण्याचे काम करतो.

सायन रुग्णालयात नेहमीच रुग्णांची मोठया प्रमाणावर वर्दळ असते. महाराष्ट्र राज्य सुरक्षा मंडळाचे सुरक्षा रक्षक येथे २४ तास तैनात असतात. तरीही या रुग्णालयात बलात्काराची घटना घडल्यामुळे पोलीस चक्रावून गेले आहेत. रुग्णालयाच्या पाचव्या मजल्यावर शुक्रवारी ही घटना घडली.

Advertisements


Advertisements

पीडित महिलेची बहिण रुग्णालयात दाखल आहे. बहिणीची देखभाल करण्यासाठी महिला रुग्णालयात आलेली होती. त्यावेळी ही घटना घडली. आरोपी नियमित रुग्णालयात येत होता. पीडित महिलेबरोबर त्याचे बोलणे व्हायचे. शुल्कामध्ये सवलत देणारा फॉर्म भरण्याच्या बहाण्याने आरोपी पीडित महिलेला पाचव्या मजल्यावर निर्जन ठिकाणी घेऊन गेला.

तिथे त्याने तिच्यावर बलात्कार केला. पीडित महिलेने लगेच या प्रकरणी तक्रार नोंदवली. सायन पोलीस स्टेशनच्या पोलीस निरीक्षक ललिता पवार यांनी ही माहिती दिली. रुग्णालयातील सीसीटीव्ही फुटेज तपासल्यानंतर पोलिसांनी शनिवारी आरोपीला अटक केली. आरोपी विरोधात बलात्काराच्या कलम ३७६ अंतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

विविधा