It seems you're using an unsafe, out-of-date browser. CLOSE(X)

राजस्थानात पोलिसांच्या पत्नीवर लैंगिक अत्याचाराची घटना , गुन्हा दाखल , आरोपी फरार

Advertisements

<SCRIPT charset=”utf-8″ type=”text/javascript” src=”//ws-in.amazon-adsystem.com/widgets/q?rt=tf_cw&ServiceVersion=20070822&MarketPlace=IN&ID=V20070822%2FIN%2F19840a8-21%2F8010%2F637dff1b-7428-4e7b-82fe-5ee3099bc298&Operation=GetScriptTemplate”> </SCRIPT> <NOSCRIPT><A rel=”nofollow” HREF=”//ws-in.amazon-adsystem.com/widgets/q?rt=tf_cw&ServiceVersion=20070822&MarketPlace=IN&ID=V20070822%2FIN%2F19840a8-21%2F8010%2F637dff1b-7428-4e7b-82fe-5ee3099bc298&Operation=NoScript”>Amazon.in Widgets</A></NOSCRIPT>

Spread the love

राजस्थानमध्ये सामूहिक बलात्काराचे एक प्रकरण गाजत असतानाच आणखी एक घटना उघडकीस आली आली आहे या घटनेत तर पोलिसाच्या पत्नीलाच लैंगिक अत्याचाराला सामोरे जावे लागल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. आरोपीने डुंगरपूर जिल्ह्यातील एका पोलिस हवालदाराच्या पत्नीलाच पोलिसांच्या वसाहतीतून उचलून नेत खेरवाडामध्ये बलात्कार केल्याची घटना घडली आहे. पीडित महिलेने दिलेल्या तक्रारीवरून ऋषभदेव ठाण्यात सुरेश कन्हैयालाल याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना ७  मे रोजी घडल्याचे पीडितेने म्हटले आहे.

पीडित महिलेने दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे कि , सादर पीडित दोन वर्षांपूर्वी खेरवाडामध्ये शिकविण्यास जात असे. आरोपी देखिल तेथे येत होता. या दरम्यान त्यांच्यामध्ये ओळख निर्माण झाली. तो तिच्याशी फोनवर बोलू लागला. याच दरम्यान आरोपीने तिचा अश्लिल फोटो काढला होता. या फोटोवरून तो तिला ब्लॅकमेल करत होता. धमकावून त्याने ४० हजार रुपये उकळले होते.  सात मे रोजी रिझर्व्ह पोलीस दलाच्या कॉलनीमध्ये  जाऊन  कन्हैयाकुमारने तिला जबरदस्तीने खेरवाडाच्या पुढे राहणाऱ्या मित्राच्या घरी नेले. यानंतर तिच्यावर बलात्कार केला. यानंतरही  याबाबत  सर्वांना सांगून तुझी बदनामी कारेन अशा  धमक्या देत बलात्कार करत होता. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून आरोपी कन्हैयाकुमार गुन्हा दाखल झाल्यानंतर फरार झाला आहे.

Advertisements


Advertisements

विविधा