पिवळ्या साडीतल्या महिला अधिकाऱ्याला शोधले आणि निळ्या ‘ड्रेस’वाल्या महिला अधिकाऱ्यालाही शोधलेच !!

Advertisements
Advertisements
Spread the love

प्रसिद्दीचं वेड मोठं विचित्र आहे. त्यासाठी कोण काय करेल याचा नेम नाही.  अनेक जण त्यासाठी जणू वेडे झाले आहेत. सध्या भारतात लोकसभेचा मोसम सुरु आहे.

Advertisements

एकमेकांवर चिखलफेक करणारी नेत्यांची भाषणं सध्या चर्चेचा विषय असला तरी सोशल मीडियावर भलत्याच गोष्टी व्हायरल होत आहेत आणि या धामधुमीतही आपली प्रचारमाध्यमं सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या फोटोंना आणि व्हिडीओला अधिकच व्हायरल करीत आहेत.

Advertisements
Advertisements

हे सगळं यासाठी सांगावं लागत आहे कि, ऐन निवडणुकीच्या धामधुमीत तुम्ही या दोन महिला मतदान अधिका-यांचे व्हायरल होत असलेले फोटो आणि व्हिडीओ पहिले असतील. अगदी तुमच्या मोबाईलवरही हे फोटो आणि व्हिडीओ आले असतील.

निवडणुकीत मतदान कर्मचारी म्हणून काम करणाऱ्या दोन महिलांच्या फोटोंनी सध्या धुमाकूळ घातला. सर्वात आधी पिवळ्या, लिंबू रंगाची साडी घातलेली महिला कर्मचारी झोतात आली नाही तोच आणखी एक निळ्या रंगांचा ड्रेस घालून कर्तव्यावर निघालेली महिला कर्मचारी चर्चेचा विषय झाली.  मग अशा व्हायरल झालेल्या व्हिडीओचा आणि फोटोंचा शोध लावणार नाहीत ते पत्रकार कसले? लोकसभेचे वार्तांकन करण्यात व्यस्त असतानाही त्यांनी या महिलांचा शोध घेऊन त्या कोण ? कुठल्या ? याचा शोध लावलाच…

होय !! याच त्या दोन महिला मतदान अधिकारी आहेत. यातील पहिली अधिकारी जी पिवळ्या म्हणजेच लिंबू रंगाच्या साडीत हातात ईव्हीएम मशीन घेऊन आपल्या कर्तव्यावर निघाली आहे. तिचा एक फोटो काय आला? तो सगळीकडे फिरू लागला. इतकेच नव्हे तर एका बहाद्दराने चक्क तिच्या विषयी खोटीच माहिती ठोकून दिली. मग काय? पत्रकारही या महिलेच्या घरापर्यंत, कार्यालया पर्यंत गेले आणि त्यांनी तिला शोधून काढलेच नाही तर “तुम्हाला आता कसं वाटतंय ? असा नेहमीचा  प्रश्नही विचारला. विशेष म्हणजे या बाईसाहेबही म्हणाल्या “छान वाटतंय !! , घरचे म्हणतात खूप नाव झालय !!आम्ही खुश आहोत…

मग काय प्रसार माध्यमांनी छापलं कि , पिवळ्या साडीतल्या या मॅडम नलिनी सिंह नसून, रीना द्विवेदी आहेत. आणि त्या लखनऊच्या पीडब्ल्यूडी विभागात कनिष्ठ सहाय्यक पदावर कार्यरत आहेत.  त्यांचे फोटो वृत्तपत्र छायाचित्रकार तुषार रॉय यांनी सर्वप्रथम काढल्याचंही  समोर आलं. पण रीना यांच्यासाठी ही गोष्ट नवीन नाही कारण या आधी सुद्धा २०१७ मधेही त्यांचे  फोटो व्हायरल झाले होते पण ते टॉप आणि जीन्सवर होते आणि यावेळी ते साडीवर आहेत इतकेच …

रीना यांचा फोटो व्हायरल झाल्यानंतर आता सोशल मीडियावर निळ्या रंगाचा झगा म्हणजे वन पीस घातलेल्या या महिला निवडणूक अधिकाऱ्याचे नाव अजून मराठी प्रसार माध्यमांना समजले नसले तरी हिंदी माध्यान्ही ते शोधून काढले आहे . या निळ्या ड्रेसवाल्या मॅडम योगेश्वरी गोहिटे, आहेत .  त्या कुंजन नगर येथील कैनरा बैंकमध्ये एका  वर्षापासून प्रमाणीकरण अधिकारी या पदावर कार्यरत आहेत.

या पूर्वी त्या  जम्मू येथे होत्या . पत्रकारांनी हेही शोधून काढले कि , त्या मूलतः  बैतूल जिल्ह्याच्या… असून योगेश्वरी यांचे पति सैन्यामध्ये मेजर आहेत आणि हो त्यांच्या मुलाचं नाव रोमिल गोहिटे आहे.  याचा शोध लावणाऱ्या झुंजार पत्रकारांनी हे सुद्धा शोधले कि , मॅडम योगेश्वरी यांची  ड्यूटी बूथ नंबर 100 गोविंदपुरा आईटीआई येथे होती आणि  तिथे 59 % मतदान झालं. आता बोला…

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूच्या अखेरच्या सामन्यात दीपिका घोष नावाची तरुणी अशीच फेमस झाली. इतकी फेमस झाली कि , एकाच  रात्री सोशल मीडियावर तिच्या फॉलोअर्सची संख्या दीड लाखांच्या वर गेली होती. एका रात्रीच प्रसिद्धीच्या शिखरावर पोहोचलेली दीपिका आता फॉलोअर्सच्या अश्लिल मॅसेजने हैराण झाली आहे. तिला त्याचा प्रचंड मानसिक त्रास होत आहे. असा आहे प्रसिद्धीचा महिमा, जितका चांगला तितकाच वाईट. आणि तुम्हाला आठवत असेल एका पाकिस्तानी महिलेचाही असाच फोटो व्हायरल झाला होता पण त्याचे कौतुक आम्हा रिकामं टेकड्या भारतीयांनाच अधिक !! आणि त्या  डोळा मारणाऱ्या वारीअरला सुद्धा सोशल मीडिया बहाद्दरांनी आणि माध्यमांनी असेच डोक्यावर घेतले होते.

यालाच म्हणतात ” सोशल मीडिया का है जमाना…”कुणाचे काय ? अन कुणाचे काय ? आजच्या निवडणुकांचा विषय काय? आणि आमचा मीडिया काय चर्चा करीत आहे? त्याचा हा नमुना…तुम्हीच ऐका आणि पहा…

आपलं सरकार