आंतरजातीय विवाह केलेल्या मुलीला पती सासरी नेत नाही म्हणून मुलीच्या डोक्यात दगड घालून आई पोलीस ठाण्यात !!

Advertisements
Advertisements
Spread the love

आंतरजातीय विवाह केलेल्या मुलीला तिचा पती नांदवावयास नेत नाही या वादातून क्रोधीत झालेल्या जन्मदात्या आईनेच विवाहित मुलीचा डोक्यात दगड घालून तिचा खून केल्याची घटना बारामतीतील प्रगतीनगर भागात घडली असून या घटनेमुळे शहरात खळबळ उडाली आहे.
युवतीने काही दिवसांपुर्वी आंतरजातीय विवाह केला होता. मात्र, तिचा पती नांदविण्यास नेत नव्हता. यावरुन घरी झालेल्या वादात रागाच्या भरात आईने मुलीच्या डोक्यात दगड घालून निर्घुण खून केला आहे. ऋतुजा हरीदास बोभाटे (वय १९) असे खुन झालेल्या मुलीचे नाव आहे. मंगळवारी सकाळी हि घटना प्रगतीनगर परीसरातील मुलीच्या घरात घडली.
मुलीच्या आंतरजातीय विवाहाला घरच्यांचा विरोध होता. पण  लग्नानंतर ऋतुजाचा पती तिला सासरी नांदविण्यास नेत नव्हता. याप्रकरणी ऋतुजाच्या पालकांनी शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. आई वडीलांनी मुलीला नांदविण्यास नेण्यासाठी तिच्या सासरच्या मंडळीबरोबर चर्चेचा प्रयत्न केला. मात्र तो निष्फळ ठरला.
नवरा घरी न्यायला तयार नसल्याने ऋतुजा घरी किरकिर करीत असे, यातुनच तिचे आईशी देखील वाद होत असे. आज सकाळी घरगुती कारणावरुन असाच वाद झाला. यावेळी रागाच्या भरात आईने मुलीच्या डोक्यात दगड घालून खून केला. इतकेच नाही तर, या प्रकारानंतर आई संजीवनी हरीदास बोभाटे हीने स्‍वत:हून बारामती शहर पोलिस ठाण्यात हजर होत, स्वतः केलेल्‍या कृत्‍याची पोलिसांसमोर कबुली दिली असल्याची माहिती उपविभागीय पोलीस अधिकारी नारायण शिरगावकर यांनी दिली आहे.

Advertisements

आपलं सरकार