News Updates : गल्ली ते दिल्ली , एक नजर , महत्वाच्या बातम्या

Advertisements
Spread the love

1. पदव्युत्तर वैद्यकीय प्रवेशाला आठवड्याची मुदत, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा निर्णय

2. मुंबई: छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर १४, ३३० अमेरिकन डॉलरची रोख रक्कम जप्त करण्यात आली, भारतीय चलनात त्याची किंमत जवळपास १० लाख रुपये

3. नाशिक: मुंबई-नाशिक महामार्गावर गोंदे शिवारात मोटारीच्या धडकेत दोन दुचाकीस्वारांचा जागीच मृत्यू

4. पुण्यात दोन गुंडांना अटक. गजा मारणे टोळीतील जमीर शेख आणि छोटा राजन टोळीतील अजय चक्रनारायण अटकेत

5. आयपीएल जिंकल्यानंतर मुंबई इंडियन्स संघाचे मुंबईत जल्लोषात स्वागत, बेस्टच्या बसवरून विजयी संघाची मिरवणूक

6. अहमदनगरः दुष्काळ सुविधांबाबत राज्य सरकार गंभीर नाही. दोन महिन्यांपासून सुरू असलेल्या जनावरांच्या छावण्यांना अजून रुपयाचे अनुदान दिले नाही, काँग्रेस आमदार बाळासाहेब थोरात यांची टीका

7. केंद्र व राज्य सरकार दुष्काळ हाताळण्यामध्ये पूर्णपणे अपयशी ठरले आहे. शेतकरी संकटात आहे. सरकारला काही देणेघेणे नाही. मात्र तुम्ही धीर सोडू नका, मी तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे – शरद पवार, अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस

8. अहमदनगर: प्रेमी युगुलाची विहिरीत उडी घेऊन आत्महत्या…चार दिवसांनंतर विहिरीत आढळले मृतदेह…शेवगाव तालुक्यातील हिंगणगाव येथील घटना

9. मध्य प्रदेश: काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियांका गांधी यांनी महाकालेश्वर मंदिरात घेतले दर्शन

10. धंदा चालवण्यासाठीच राजकारण्यांकडून टँकर लॉबीला मोकळं रान करून दिलं जातं: राज ठाकरे

11. १५ मिनिटे चर्चा करण्याचं आव्हान मी पंतप्रधान नरेंद्र मोदींना दिलं: राहुल गांधी

Leave a Reply