Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

अलवर येथील मागासवर्गीय महिलेवर झालेल्या सामूहिक बलात्कारावरून राजकारण तापले

Spread the love

काय आहे प्रकरण…?

२६ एप्रिलला संबंधित महिला तिच्या नवऱ्यासह प्रवास करीत असताना नवऱ्याला झाडाला बांधून त्याच्यासमोर पत्नीवर सामूहिक बलात्कार केल्याची घटना घडली होती. त्यांनी पोलिसांत तक्रार देण्याचा प्रयत्न केला मात्र, निवडणुकीच्या कामाचा ताण असल्याचे सांगत २ मे रोजी तक्रार दाखल करून घेतली, असा दावा पीडित महिलेच्या पतीने केली आहे.

लोकसभा निवडणुकीच्या आरोप-प्रत्यारोपांमध्ये राजस्थानच्या अलवर येथील मागासवर्गीय जातीतील महिलेवर झालेल्या सामूहिक बलात्काराचा मुद्दा तापला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या प्रकरणी बहुजन समाज पक्षाच्या प्रमुख मायावती यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला. ‘अलवरमध्ये एका मागासवर्गीय जातीच्या मुलीवर बलात्कार झाला आहे. या प्रकरणी मायावती मगरीचे अश्रू ढाळत आहेत. बसपने राजस्थानमधील अशोक गेहलोत सरकारला दिलेला पाठिंबा तत्काळ काढून घेतला पाहिजे,’ अशी मागणी पूर्व उत्तर प्रदेशातील कुशीनगर आणि देवरिया येथील प्रचार सभेत बोलताना मोदींनी केली.

‘अलवरमध्ये २६ एप्रिलला एका मागास जातीच्या महिलेवर सामूहिक बलात्कार झाला होता. संबंधित कुटुंब ३० एप्रिलला पोलिस ठाण्यात तक्रार देण्यासाठी गेले होते. मात्र, राजस्थानमध्ये २९ एप्रिल आणि ६ मे रोजी लोकसभेचे मतदान असल्याने त्यांनी तक्रार दाखल करून घेतली नव्हती. निवडणुका होईपर्यंत हे प्रकरण काँग्रेसला दडपून ठेवायचे होते,’ असा आरोप मायावतींनी केला होता. त्यांनी या प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाकडे गेहलोत सरकार, प्रशासन आणि पोलिसांवर कारवाई करण्याची मागणी केली होती. मायावतींची ही टीका ‘नक्राश्रू’ असल्याची टीका मोदींनी केली.

पंतप्रधान मोदी यांच्या टीकेला मायावतींनीही तातडीने उत्तर दिले. ‘अलवर प्रकरणाचे मोदी घाणेरडे राजकारण करीत आहेत. देशात यापूर्वी झालेल्या मागास जातीच्या महिलांवरील बलात्कार आणि उना, रोहित वेमुला आणि मागास जातींवर होत असलेल्या अन्यायाची नैतिक जबाबदारी घेऊन त्यांनीच राजीनामा द्यायला हवा’, असे मायावती म्हणाल्या. अलवर प्रकरणात कायदेशीर कारवाई न झाल्याप्रकरणी बसप योग्य राजकीय निर्णय घेईल, असेही त्यांनी नमूद केले.  दरम्यान अलवरप्रकरणी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि बसप प्रमुख मायावती राजकीय फायदा उठविण्याचा प्रयत्न करीत आहे,’ असा आरोप काँग्रेसने केला आहे. दरम्यान,

आपलं सरकार

Click to listen highlighted text!