It seems you're using an unsafe, out-of-date browser. CLOSE(X)

काँग्रेसला ४० हुन अधिक जागा मिळाल्यास मोदी फाशी घेतील काय ? मल्लिकार्जुन खर्गे यांचा सवाल

Advertisements

<SCRIPT charset=”utf-8″ type=”text/javascript” src=”//ws-in.amazon-adsystem.com/widgets/q?rt=tf_cw&ServiceVersion=20070822&MarketPlace=IN&ID=V20070822%2FIN%2F19840a8-21%2F8010%2F637dff1b-7428-4e7b-82fe-5ee3099bc298&Operation=GetScriptTemplate”> </SCRIPT> <NOSCRIPT><A rel=”nofollow” HREF=”//ws-in.amazon-adsystem.com/widgets/q?rt=tf_cw&ServiceVersion=20070822&MarketPlace=IN&ID=V20070822%2FIN%2F19840a8-21%2F8010%2F637dff1b-7428-4e7b-82fe-5ee3099bc298&Operation=NoScript”>Amazon.in Widgets</A></NOSCRIPT>

Spread the love

लोकसभा निवडणुकीत काँग्रेसला ४० पेक्षा अधिक जागा मिळणार नाहीत, असं पंतप्रधान नरेंद्र मोदी प्रत्येक सभेत सांगत आहेत. मोदींचं हे म्हणणं तुम्हाला तरी पटतंय का? असा सवाल करतानाच काँग्रेसला जर ४० हून अधिक जागा मिळाल्या तर मोदी दिल्लीतील विजय चौकात स्वत:ला गळफास लावून घेतील काय? असा थेट सवाल काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मल्लिकार्जुन खरगे यांनी नरेंद्र मोदी यांना केला आहे.

लोकसभेसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी सध्या देशभर झंझावती प्रचार करत आहेत. काँग्रेसला या निवडणुकीत चाळीस जागाही मिळणार नाहीत, असा दावा पंतप्रधान मोदींनी अनेक सभांमध्ये व्यक्त केला आहे. याचाच खरगे यांनी रविवारी समाचार घेतला. कलबुर्गी जिल्ह्यातील चिंचोली येथे प्रचारसभेत ते म्हणाले, ‘मोदी जिथेही जातात तिथे काँग्रेसला ४० जागाही मिळणार नाहीत असा जप करत राहतात. तुम्हाला हे खरं वाटतं का? आणि जर का काँग्रेसला ४०हून जास्त जागा मिळाल्या तर मोदी फाशी घेतील का?’. काँग्रेसला २०१४ मध्ये ४४ जागा मिळाल्या होत्या.

Advertisements


Advertisements

खरगेंच्या या प्रतिक्रियेवर भाजपने तीव्र आक्षेप नोंदवला आहे. खरगेंसारख्या ज्येष्ठ संसदपटूंना ही भाषा शोभा देत नाही, अशी प्रतिक्रिया भाजप नेत्या शोभा करंदलाजे यांनी व्यक्त केली आहे. तर इतर ही नेत्यांनी या विधानावर आक्षेप घेतला आहे. मोदींबद्दल आक्षेपार्ह विधानं करण्याची खरगे यांची ही पहिलीच वेळ नाही. मुंबईत काँग्रेसच्या एका कार्यक्रमात त्यांनी मोदींची तुलना हिटलरशी केली होती. हिटलरने जे जर्मनीत केलं होतं तेच मोदी भारतात करू पाहत आहेत, अशा शब्दात त्यांनी मोदींना लक्ष केलं होतं.

विविधा