Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

गडचिरोली : एटापल्ली तालुक्यात पुन्हा नाक्षवाद्यांकडून वाहनांची जाळपोळ !!

Spread the love

गडचिरोलीतील नक्षलवादी हल्ला होऊन काही दिवस उलटत नाहीत तोच पुन्हा  एटापल्ली तालुक्यात पंतप्रधान सडक योजनेच्या कामासाठी वापरण्यात येणाऱ्या वाहनांची नक्षलवाद्यांनी जाळपोळ करून नासधूस केल्याची घटना घडली आहे. रविवारी मध्यरात्री नक्षलवाद्यांनी ही वाहने जाळून लाखो रुपयांचं नुकसान केलं आहे.  एटापल्ली तालुक्यातील एमलीजवळ पंतप्रधान सडक योजनेतून रस्त्याची कामं सुरू होती. त्यासाठी रस्त्यावर रोडरोलर, पाण्याचा टँकर, दोन मिक्सर मशीन आदी साहित्य आणण्यात आलं होतं. मात्र रविवारी रात्री नक्षलवाद्यांनी या ठिकाणी येऊन या सर्व साहित्यांना आग लावल्याने लाखो रुपयांचं नुकसान झालं आहे. या घटनेनंतर पोलिसांनी सकाळी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला आहे. याबाबत अधिक तपास सुरू असल्याचं पोलीस सूत्रांनी सांगितलं.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!