सॅम पित्रोडा यांना नव्हे नामदार , लाज तर तुम्हाला वाटली पाहिजे : नरेंद्र मोदी यांचा राहुल गांधी यांच्यावर पलटवार

Advertisements
Advertisements
Spread the love

काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी सॅम पित्रोडा यांना १९८४ दंगलीप्रकरणी केलेल्या वादग्रस्त वक्तव्याची लाज वाटली पाहिजे तसंच जाहीर माफी मागावी असं म्हटलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मात्र यावरुन राहुल गांधींवर निशाणा साधत लाज त्यांना नाही तुम्हाला वाटली पाहिजे असं म्हटलं आहे. सॅम पित्रोडा यांनी १९८४ च्या दंगलीचं काय घेऊन बसलात? ती दंगल तर घडून गेली, पंतप्रधान नरेंद्र मोदींनी गेल्या पाच वर्षात काय केलं हे देशाला सांगावं असं वक्तव्य केल्याने वाद निर्माण झाला आहे.

Advertisements

राहुल गांधी यांनी पंजाबमधील फतेहगड साहिब येथील प्रचारसभेत बोलताना म्हटलं होतं की, ‘सॅम पित्रोडा यांनी १९८४ च्या दंगलीसंबंधी जे भाष्य केलं आहे ते अत्यंत चुकीचं आहे. त्यांनी देशाची माफी मागितली पाहिजे. मी त्यांना फोन करुन सांगितलं की, तुम्ही जे बोललात ते खूप चुकीचं होतं. त्यांना लाज वाटली पाहिजे आणि जाहीर माफी मागावी’.

Advertisements
Advertisements

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राहुल गांधींच्या या वक्तव्याचा समाचार घेत या माफीचा काहीच फायदा नसल्याचं सांगितलं आहे. यावेळी नरेंद्र मोदी यांनी राहुल गांधींचा उल्लेख नामदार असा केला. ‘नामदार आपल्या गुरुंना लाज वाटली पाहिजे असं सांगत असल्याचं मी पाहत होतो. मला नामदारांना विचारायचं आहे की, तुम्ही तुमच्या गुरुंना कशाबद्दल ओरडत आहात ? कारण त्यांनी काँग्रेसच्या मनात जे आहे ते उघड केलं ? कुटुंबाचं रहस्य त्यांनी सार्वजनिक केलं म्हणून ? अहो नामदार लाज तर तुम्हाला वाटायला हवी’, अशी टीका नरेंद्र मोदींनी केली आहे.

आपलं सरकार