फाशी घेणाऱ्या पोलीस प्रियकराला प्रेयसीनेच वाचवले…

Advertisements
Advertisements
Spread the love

एका पोलीस कर्मचाऱ्याने प्रेयसीच्या घरी गळफास घेऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याचे वृत्त आहे. वाईतील एका खाजगी रुग्णालयात या पोलिसावर उपचार सुरू असून त्याची प्रकृती चिंताजनक असल्याचे समजते. या घटनेने पोलीस दलात एकच खळबळ उडाली आहे. या घटनेमागील कारण मात्र अद्याप कळू शकलेले नाही.

Advertisements

पाचगणी पोलीस दलात कार्यरत असलेला हा पोलीस कर्मचारी वाईतच वास्तव्यास आहे. दुपारच्या सुमारास तो आपल्या प्रेयसीच्या घरी गेला होता. यावेळी दोघांमध्ये वाद झाला त्यानंतर त्याने पंख्याला गळफास लावून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याची चर्चा आहे. आत्महत्येचा प्रयत्न केल्यानंतर त्याच्या प्रेयसीने प्रसंगावधान दाखवून गळफास घेतलेला कपडा चाकूने कापून टाकला. त्यामुळे या पोलिसाचा जीव वाचला त्यानंतर तिनेच शेजारांच्या मदतीने त्याला रिक्षातून खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले, यावेळी तो अत्यावस्थ होता.

Advertisements
Advertisements

या पोलिसाच्या गळ्याला गंभीर दुखापत झाली असून त्याच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत. सध्या त्याची प्रकृती स्थिर असली तरी चिंताजनक आहे. वाई पोलीस ठाण्यातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी घटनेची माहिती मिळताच रुग्णालयात जाऊन यासंदर्भात डॉक्टरांशी चर्चा केली आणि परिस्थितीचा आढावा घेतला.

आपलं सरकार