बालाकोट एअरस्ट्राइक : ‘त्या’ विधानावरुन मोदी झाले ट्रोल , भाजपाने पोस्ट केली ” गोल ” …

Advertisements
Advertisements
Spread the love

‘हल्ल्याआधीच्या ढगाळ वातावरण आणि पावसामुळे हल्ल्याची तारीख बदलण्याच्या विचारात तज्ज्ञ होते, त्यावेळी भारतीय विमानांना रडारपासून वाचण्यासाठी अशा वातावरणाचा फायदा होऊ शकतो असा सल्ला मी दिला होता’ अशाप्रकारचे  विधान मोदींनी केल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदीं यांच्या नुकत्याच प्रसारीत झालेल्या एका वृत्तवाहिनीवरील मुलाखतीमधील या विधानावरून  विरोधक मोठ्या प्रमाणात त्यांची खिल्ली उडवली जात आहे. बालाकोट हवाई हल्ल्याच्या तयारीबाबत मोदींनी या मुलाखतीत भाष्य  केले होते. त्यांच्या या विधानावरुन विरोधकांनी मोदींना लक्ष्य केलं आहे. दरम्यान, ट्रोल झाल्यानंतर मोदींचे  ते विधान गुजरात भाजपाच्या अधिकृत ट्विटर हँडलवरुन ट्विट करण्यात आले होते मात्र, सोशल मीडियामध्ये खिल्ली उडायला सुरूवात झाल्यानंतर ते ट्विट गुजरात भाजपाच्या अकाउंटवरुन डीलिट करण्यात आलं आहे.

Advertisements

काय म्हणाले  मोदी मुलाखतीत –
”मी 9 वाजता (हवाई हल्ल्याच्या तयारीबाबत) माहिती घेतली…त्यानंतर 12 वाजता पुन्हा माहिती घेतली. त्यावेळेस वातावरण अचानक खराब झालं होतं आणि ती आमच्यासमोरील मोठी समस्या होती…खूप पाऊस झाला…मी हैराण झालो, आतापर्यंत देशातील एवढे विद्वान लोक मला शिव्या घालतात, त्यांचं डोकं येथे चालत नाही. 12 वाजता…मी पहिल्यांदाच हे सांगतोय…एका क्षणासाठी आमच्या मनात आलं अशा खराब वातावरणात आपण काय करणार…ढग जातील की नाही…त्यावेळी तज्ज्ञ देखील हल्ल्याची तारीख बदलण्याच्या विचारात होते…त्यावेळी माझ्ा मनात दोन विचार डोकावले…एक गोपनियता….आतापर्यंत सर्व गोपनिय होतं… गोपनियतेत जर काही चूक झाली तर आम्हीच काही करु शकणार नव्हतो…दुसरा विचार माझ्या मनात आला…मला सर्व विज्ञान काही समजत नाही, पण ढगाळ वातावरण आहे, पाऊस पडतोय याचा आपल्याला फायदाच होऊ शकतो असा विचार माझ्या मनात आला. आपण त्यांच्या रडारपासून वाचू शकतो काय…आकाशात जमा झालेल्या ढगांचा फायदा होऊ शकतो असा माझा विचार असल्याचं मी सांगितलं…सगळे बुचकळ्यात पडले…अखेरीस मी म्हटलं…ओके जा…नंतर ते निघाले”.

Advertisements
Advertisements

आपलं सरकार