Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

महानायक लाईव्ह : मतदानाच्या सहाव्या टप्प्याला उत्साहात प्रारंभ, सायंकाळी ७ पर्यंत देशात ६१.१४ टक्के मतदान

Spread the love

सायंकाळी ७ वाजेपर्यंत पश्चिम बंगालमध्ये ८०.१६ टक्के, दिल्लीत ५६.११ टक्के, हरयाणात ६२.९१ टक्के, उत्तर प्रदेशमध्ये ५३.३७ टक्के, बिहारमध्ये ५९.२९ टक्के, झारखंडमध्ये ६४.४६ टक्के, तर मध्य प्रदेशमध्ये ६०.४० टक्के मतदान

सायंकाळी ७ वाजेपर्यंत देशभरात ६१.१४ टक्के मतदान

दिल्लीः उपराष्ट्रपती वैंकय्या नायडू यांनी आपल्या पत्नीसमवेत बजावला मतदानाचा हक्क

दुपारी ४ वाजेपर्यंत दिल्लीत ४५.२२, बिहारमध्ये ४४.४०, हरयाणामध्ये ५१.८० टक्के, मध्य प्रदेशमध्ये ५२.६२, उत्तर प्रदेशमध्ये ४३.२६, पश्चिम बंगालमध्ये ७०.५१ आणि झारखंडमध्ये ५८.०८ टक्के मतदान

दिल्ली: काँग्रेस नेत्या प्रियंका गांधी-वाड्रा आणि त्याचे पती रॉबर्ट वाड्रा यांनी केले मतदान

मतदानातून जनता सत्ताधाऱ्यांविरोधातला रोष व्यक्त करणार; प्रियंका गांधी यांचे प्रतिपादन

दिल्ली: मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे नेते प्रकाश करात यांनी मतदानाचा अधिकार बजावला

दुपारी १२ वाजेपर्यंत पश्चिम बंगाल ३८.२६, दिल्ली १९.५५ टक्के, हरयाणा २३.२६ टक्के,उत्तर प्रदेश २१.७५ टक्के, बिहार २०. ७० टक्के, झारखंड ३१.२७ टक्के, मध्य प्रदेश २८.२५ टक्के मतदान

उत्तर प्रदेश: जौनपूरमध्ये भाजप कार्यकर्त्यांचा पोलिसावर हल्ला

दिल्ली: नीती आयोगाचे सीईओ अमिताभ कांत आणि निवडणूक आयुक्त सुनील अरोरा यांनी मतदान केले

बसपा अध्यक्षा मायावती यांनी मतदारांना मतदानाचे आवाहन केले, स्वत:चर्या सुरक्षित भविष्यासाठी करा मतदान

दिल्ली: माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेस उमेदवार शीला दीक्षित यांनी मतदानाचा हक्क बजावला

हरयाणा: गुरुग्राममधील एका पोलिंग बूथवर मतदानासाठी महिला मतदारांची गर्दी

दिल्ली: काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी बजावला मतदानाचा हक्क

सकाळी ९ वाजेपर्यंत बिहारमध्ये ९.३ टक्के, हरयाणामध्ये ३.७४ टक्के, मध्य प्रदेशमध्ये ४.१ टक्के, उत्तर प्रदेशमध्ये ६.८६ टक्के, पश्चिम बंगालमध्ये ६.५८ टक्के, झारखंडमध्ये १२.४५ टक्के आणि दिल्लीत ३.७४ टक्के मतदान

दिल्ली: राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी बजावला मतदानाचा हक्क

पश्चिम बंगाल: भाजप उमेदवार भारती घोष यांच्या कारवर हल्ला; तृणमूल काँग्रेसने हल्ला केला असल्याचा भाजपचा आरोप

दिल्ली: परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज आणि मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी आपला मतदानाचा अधिकार बजावला

पश्चिम बंगालमध्ये मतदानासोबतच हिंसाचाराच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. मिदनापूर इथल्या तृणमूलच्या दोन कार्यकर्त्यांवर गोळीबार करण्यात आला आहे. दोन्ही कार्यकर्त्यांवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत

लोकसभेच्या सहाव्या टप्प्यातील मतदान आज होत आहे. यात पश्चिम बंगालमधील 8 जागांवर मतदान सुरु आहे. मात्र, मतदानाच्या आधी बंगालमधीव झारग्राम इथं भारतीय जनता पार्टीच्या बूथ कार्यकर्त्याचा मृतदेह आढळल्याने मोठी खळबळ उडाली आहे. तसेच तृणमूल काँग्रेसच्या एका कार्यकर्त्याचाही मृतदेह आढळला आहे. याशिवाय तृणमूलच्या दोन कार्यकर्त्यांवर गोळीबार करण्यात आल्याची घटना घडली आहे.

भाजप उमेदवार आणि माजी क्रिकेटपटू गौतम गंभीरने आपला मतदानाचा हक्क बजावला

सहाव्या टप्प्यात उत्तर प्रदेशातील १४, मध्य प्रदेशातील ८, बिहारमधील ८, पश्चिम बंगालमधील ८, हरयाणातील १० आणि दिल्लीतील ७ जागांवर होतंय मतदान

लोकसभा निवडणुकीसाठी सहाव्या टप्प्यातील मतदानाला सुरुवात झाली आहे. या टप्प्यात ५९ जागांसाठी मतकौल दिला जाणार असून ९७९ उमेदवारांचे भवितव्य ठरवणारा हा टप्पा आहे. दरम्यान, या टप्प्यात दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. भोपाळमध्ये काँग्रेस नेते दिग्विजय सिंह यांच्याविरुद्ध भाजपने मालेगाव बॉम्बस्फोटातील आरोपी प्रज्ञासिंह ठाकूरला उमेदवारी दिल्याने त्या लढतीकडे देशाचे लक्ष लागलेले आहे. याशिवाय दिल्लीतील सर्व ७ जागांवर आज मतदान होत आहे.

 

आपलं सरकार

Click to listen highlighted text!