Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

नमो टीव्हीः भाजपला निवडणूक आयोगाची नोटीस

Spread the love

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रचार संपुष्टात आल्यानंतरही ‘नमो टीव्ही’वर निवडणुकांसंदर्भातील माहितीचे प्रक्षेपण सुरूच ठेवल्याने दिल्लीच्या मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांनी भारतीय जनता पक्षाला नोटीस बजावली आहे. एका वरिष्ठ अधिकाऱ्याने ही माहिती दिली.

दिल्लीतील लोकसभा मतदारसंघात उद्या (रविवार) मतदान होणार आहे. त्यामुळे शुक्रवारी सायंकाळी दिल्लीतील प्रचारतोफा थंडावल्या. प्रचाराची वेळ संपल्यावरही नमो टीव्हीवर निवडणुकासंदर्भातील माहितीचे प्रक्षेपण सुरू होते. यावरून दिल्लीतील मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांनी भाजपला नोटीस बजावली, अशी माहिती रणबीर सिंह यांनी दिली. या नोटिसीला उत्तर देण्यासाठी भाजपकडे एका दिवसाचा अवधी आहे.

दरम्यान, नमो टीव्हीवर प्रक्षेपित होणारे कार्यक्रम संग्रहीत असावेत आणि त्याचे प्रमाणपत्र घेतलेले असावे, असे निर्देश निवडणूक आयोगाने दिले होते. नमो टीव्ही भाजप पुरस्कृत असल्यामुळे पक्षाला नोटीस बजावण्यात आली आहे.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!