भाजप पुन्हा सत्तेत येणार नाही, हि निवडणूक म्हणजे लोकशाहीची परीक्षा : प्रियांका गांधी

Advertisements
Advertisements
Spread the love

पंतप्रधान पदावर आरुढ झाल्यापासून नरेंद्र मोदी यांनी देशातील नागरिकांना खूप त्रास दिलाय. लोकांनीही खूप सहन केलंय. त्यामुळे देशाची लोकशाही वाचवणं महत्त्वाचं असून त्यासाठीच ही लढाई लढली जात आहे, असं सांगतानाच भाजपचं सरकार सत्तेतून जात आहे, असं काँग्रेसच्या महासचिव प्रियांका गांधी यांनी सांगितलं.

Advertisements

प्रियांका गांधी यांनी पती रॉबर्ट वाड्रा यांच्यासोबत लोदी इस्टेट येथील मतदान केंद्रावर जाऊन मतदान केलं. यावेळी प्रसारमाध्यमांशी बोलताना त्यांनी ही प्रतिक्रिया व्यक्त केली. मोदींनी १५ लाख रुपये देण्याचं आणि रोजगार देण्याचं आश्वासन दिलं होतं. त्यावर ते आता बोलत सुद्धा नाहीत. या मुद्दयावर बोलायचं सोडून ते भलत्याच विषयावर बोलत आहेत, असं सांगतानाच यावेळी भाजप पुन्हा सत्तेत येणार नाही, असंही त्यांनी स्पष्ट केलं.
या लोकसभा निवडणुकीत प्रियांका गांधी यांना काँग्रेसने पूर्व उत्तर प्रदेशातील प्रभारी नियुक्त करण्यात आलं आहे. यंदा त्यांनी अमेठी आणि रायबरेलीच्या बाहेर निवडणूक प्रचार केला आहे. उत्तर प्रदेशातील अनेक जिल्ह्यात रोड शो करून त्यांनी काँग्रेसला उभारी देण्याचं काम केलं आहे

Advertisements
Advertisements

आपलं सरकार