कॅन्सरवरील उपचारानंतर सिने अभिनेते ऋषी कपूर दोन महिन्यानंतर येतील परत : रणबीर कपूर

Advertisements
Advertisements
Spread the love

कॅन्सरसारख्या दुर्धर आजारावर उपचार घेण्यासाठी परदेशात गेलेले अभिनेते ऋषी कपूर लवकरच मायदेशी परतणार आहेत. कॅन्सरवर मात करून ऋषी कपूर भारतात परतणार असल्याची माहिती अभिनेता रणबीर कपूरने दिली आहे. ऋषी कपूर कॅन्सरसारख्या जीवघेण्या आजारावर उपचार करण्यासाठी २०१८ सालच्या सप्टेंबर महिन्यात न्यूयॉर्कला गेले होते. उपचार घेऊन ते भारतात परत कधी येणार याविषयी वेगवेगळे अंदाज बांधले जात होते. ऋषी यांचे ज्येष्ठ बंधू आणि अभिनेते रणधीर कपूर यांनीही काही दिवसांपूर्वी ऋषी कपूर कॅन्सरमुक्त झाल्याचं ट्विट केलं होतं. त्यामुळे त्यांच्या चाहत्यांनी सुटकेचा नि:श्वास सोडला होता. आता रणवीर कपूरनेही ‘त्यांची प्रकृती पूर्वीपेक्षा चांगली आहे. ते दोन महिन्यात परत येतील.’ असं ट्विट केल्याने जुलैमध्ये ऋषी कपूर परत येतील असा कयास वर्तवला जात आहे.

Advertisements

आपलं सरकार