मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर आंबोली येथे दोन कार आणि दुचाकीच्या अपघातात ६ ठार

Advertisements
Spread the love

मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर आंबोली येथे दोन कार आणि एका दुचाकीचा भीषण अपघात झाला. या अपघातात ६ जणांचा मृत्यू झाला आहे तर तीन जण गंभीर जखमी आहेत. मृतांमध्ये एका महिलेचा समावेश आहे. जखमींवर सध्या कासा उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

मुंबईकडून गुजरातकडे जाणाऱ्या भरधाव कारमध्ये टक्कर झाली. समोर दुचाकी आल्याने हा भीषण अपघात घडला. या अपघातात तिन्ही वाहनांचा चक्काचूर झाला आहे. यातील एक वाहन मुंबईतील बोरिवली येथील असल्याचं सांगण्यात येतंय. मृतांमध्ये १. राकेश शाह २. प्रतिभा शाह  ३. बी. डी. जाधव (पनवेल)  ४. नवनाथ नवले (मोखाडा)  ५. आकाश  चव्हाण  ६. दिलीप चंदने यांचा समावेश आहे .

 

Leave a Reply