It seems you're using an unsafe, out-of-date browser. CLOSE(X)

मोदींचा नवा चित्रपट येतोय, ‘फेकू नंबर १’ , ‘ना राम, ना रोजगार : सिद्दू यांची मोदींवर टीका

Advertisements

<SCRIPT charset=”utf-8″ type=”text/javascript” src=”//ws-in.amazon-adsystem.com/widgets/q?rt=tf_cw&ServiceVersion=20070822&MarketPlace=IN&ID=V20070822%2FIN%2F19840a8-21%2F8010%2F637dff1b-7428-4e7b-82fe-5ee3099bc298&Operation=GetScriptTemplate”> </SCRIPT> <NOSCRIPT><A rel=”nofollow” HREF=”//ws-in.amazon-adsystem.com/widgets/q?rt=tf_cw&ServiceVersion=20070822&MarketPlace=IN&ID=V20070822%2FIN%2F19840a8-21%2F8010%2F637dff1b-7428-4e7b-82fe-5ee3099bc298&Operation=NoScript”>Amazon.in Widgets</A></NOSCRIPT>

Spread the love

‘मोदी नव्या नवरीसारखे आहेत. जे काम कमी करतात, पण बांगड्याच जास्त वाजवतात. मोदी सरकारमध्ये अगदी तेच झालंय,’ असं  विधान माजी क्रिकेटपटू आणि पंजाबचे मंत्री नवज्योत सिंग सिद्धू यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींची तुलना नवऱ्या नवरीशी करून सिद्धूंनी खळबळ उडवून दिली आहे. लोकसभा निवडणुकीच्या सहाव्या टप्प्याचं मतदान रविवारी होत आहे. प्रचाराच्या अखेरच्या दिवशी शुक्रवारी सिद्धू यांनी मध्य प्रदेशातील इंदूरमध्ये पंतप्रधान मोदींवर तिखट शब्दांत हल्ला चढवला. भाजप  सरकारला सत्तेतून हद्दपार करा, असं आवाहनही त्यांनी इंदूरवासियांना केलं.

मोदींवर टीका करताना त्यांची जीभ घसरली. ‘मोदीजी नव्या नवरीसारखे आहेत. जे भाकऱ्या कमी भाजतात, पण बांगड्यांचा आवाजच जास्त करतात. काम करत आहे असं शेजाऱ्यांना वाटलं पाहिजे. मोदी सरकारची अशीच गत आहे,’ असं ते म्हणाले. यावेळी त्यांनी मोदी खोटे बोलत असल्याचा आरोप केला. हिरो नंबर १, कुली नंबर १, बीवी नंबर १ सारखे चित्रपट पाहिलेत. पण यावेळी मोदींचा नवा चित्रपट येतोय. त्याचं नाव ‘फेकू नंबर १’ आहे, असा टोलाही त्यांनी लगावला. ‘ना राम, ना रोजगार, गल्लीबोळात मोबाइलमध्ये रमणारा बेरोजगार मिळाला,’ अशी टीकाही त्यांनी केली. राफेलवरूनही त्यांनी मोदींना सवाल केले. दहा रुपयांचे पेन खरेदी करताना दुकानदाराकडून बिल घ्यायला हवे, असं मोदी देशातील जनतेला सांगत असतात. पण राफेल विमानांच्या खरेदीच्या किंमतींबाबत चर्चा होते, तेव्हा ते हडबडून का जातात? असा थेट सवालही त्यांनी केला.

Advertisements


Advertisements