It seems you're using an unsafe, out-of-date browser. CLOSE(X)

अमिताभ बच्चन करताहेत मराठी चित्रपटात भूमिका

Advertisements

<SCRIPT charset=”utf-8″ type=”text/javascript” src=”//ws-in.amazon-adsystem.com/widgets/q?rt=tf_cw&ServiceVersion=20070822&MarketPlace=IN&ID=V20070822%2FIN%2F19840a8-21%2F8010%2F637dff1b-7428-4e7b-82fe-5ee3099bc298&Operation=GetScriptTemplate”> </SCRIPT> <NOSCRIPT><A rel=”nofollow” HREF=”//ws-in.amazon-adsystem.com/widgets/q?rt=tf_cw&ServiceVersion=20070822&MarketPlace=IN&ID=V20070822%2FIN%2F19840a8-21%2F8010%2F637dff1b-7428-4e7b-82fe-5ee3099bc298&Operation=NoScript”>Amazon.in Widgets</A></NOSCRIPT>

Spread the love

मिलिंद लेले दिग्दर्शित ‘ए बी आणि सी डी’ या मराठी चित्रपटात बॉलिवूडचे महानायक अर्थात अमिताभ बच्चन तब्बल २५ वर्षांनंतर मराठी चित्रपटसृष्टीत काम करणार आहेत.  या चित्रपटात विक्रम गोखलेंसोबत त्यांची महत्वाची दृश्ये आहेत. या चित्रपटाची कथा पटकथा आणि संवाद हेमंत ऐदलाबादकर यांची आहे.

येत्या २० मेपासून मुंबईत या चित्रपटाच्या शूटिंगला सुरुवात होणार आहे. मुंबई आणि पुणे येथे या चित्रपटाचे बरेचसे चित्रीकरण होईल. या चित्रपटात दोन गाणीही आहेत. यापूर्वी बिग बींनी दीपक सावंत यांनी निर्मिलेल्या आणि श्रीधर जोशी दिग्दर्शित “आक्का ” (१९९४) या मराठी चित्रपटात जया बच्चन यांच्यासोबत ‘तू जगती अधिपती’ या गणपती आरती गीतात भूमिका साकारली. त्यानंतर तब्बल पंचवीस वर्षांनी ते मराठी चित्रपटाच्या पडद्यावर दिसतील. उमेश विनायक कुलकर्णी दिग्दर्शित ‘विहीर’ ( २००९) या मराठी चित्रपटाची निर्मिती बिग बींच्या ‘ए बी सी एल’ या कंपनीच्या वतीने करण्यात आली होती.

Advertisements


Advertisements